JEE Advanced २०२२ परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ‘या’ तारखेपासून, पाहा संपूर्ण वेळापत्रक

JEE Advanced 2022: संयुक्त प्रवेश परीक्षा २०२२ (JEE Advanced) नोंदणी अपडेटची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT Bombay) ने जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणीची तारीख जाहीर केली आहे. याची नोंदणी प्रक्रिया ८ जूनपासून सुरू होईल आणि १४ जूनला संपेल. जेईई अॅडव्हान्स परीक्षा ३ जुलै २०२२ रोजी घेतली जाणार आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार जेईई अॅडव्हान्स २०२२ च्या नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ला भेट देऊ शकतात.

जेईई अॅडव्हान्स २०२२ वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत उमेदवारांची फी भरण्याची अंतिम तारीख १५ जून २०२२ आहे. जेईई अॅडव्हान्स २०२२ (JEE Advanced 2022) प्रवेशपत्र २७ जूनपासून अधिकृत जेईई अॅडव्हान्स वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. उमेदवार जुलैपर्यंत प्रवेशपत्र (Jee Advanced Admit Card) डाउनलोड करू शकतात. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. उमेदवारांना पेपर १ मध्ये उपस्थित राहण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १२ आणि पेपर २ साठी दुपारी २.३० ते ५.३० पर्यंत वेळ देण्यात येईल.

Government Job: ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ करा अर्ज
१८ जुलैपर्यंत निकाल
परीक्षा संपल्यानंतर ९ जुलैपर्यंत प्रोव्हिजनल उत्तरतालिका वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. जेईई अॅडव्हान्स २०२२ च्या निकालासह अंतिम उत्तरतालिका १८ जुलैपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. भारतीय नागरिकांना जेईई अॅडव्हान्स २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी २,८०० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. राखीव प्रवर्ग आणि महिला उमेदवारांसाठी शुल्कात सवलत देण्यात आली आहे. महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) समुदायातील उमेदवार आणि अपंग व्यक्ती (PWD) श्रेणी अंतर्गत येणार्‍या उमेदवारांसाठी, नोंदणी शुल्क १,४०० रुपये असेल.

हेही वाचा :  JEE Main 2022 Exam: एनटीएकडून जेईई मेन परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट

Indian Navy मध्ये दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी
जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार भारतभरातील विविध आयआयटी आणि पदवीपूर्व इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. जेईई मेन २०२२ परीक्षेत २ लाख ५० हजारपेक्षा कमी रँक मिळविणारे उमेदवार जेईई अॅडव्हान्स २०२२ साठी बसू शकतात.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

GAIL India Recruitment 2022: गेल कंपनीत एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी भरती
TIFR Recruitment: टाटा रिसर्च सेंटरमध्ये भरती, पदभरतीचा तपशील जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …