Jayant Patil: शरद पवार यांचा राजीनामा मंजूर का केला नाही? जयंत पाटलांनी सांगितलं खरं कारण!

Jayant Patil Exclusive Interview: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचं काय होणार? शरद पवार राजीनामा मागे घेणार की नाही? राष्ट्रवादीचं भविष्य कोणाच्या हातात असेल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच झी 24 तासच्या ब्लॉक अँड व्हाईट (Black & White) मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अनेक खुलासे केले आहेत.

काय म्हणाले जयंत पाटील?  

शरद पवार यांनी अचानक निर्णय घोषित केला, त्यामुळे कार्यकर्त्यांसह अनेकांच्या भावनेचा उद्रेक झाला. सर्वांचं समाधान करणारी व्यक्ती म्हणून आजही आमच्या पक्षात किंवा देशपातळीवर शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात आपुलकीची भावना आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना पवारसाहेबांनी तयार केलंय, असं जयंत पाटील म्हणतात.

राजीनामा मंजूर का केला नाही?

येत्या 8 महिन्यात लोकसभा निवडणूक आहे, त्यानंतर राज्याची विधानसभा आहे. एवढ्याच काळात नव्या नेतृत्वासह पक्ष कसा जिंकायचा? राष्ट्रवादीचा बँड शरद पवार आहेत. त्यामुळे त्यांना असा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. जर निवडणुकीला 4 वर्ष वेगरे राहिले असते तर निर्णय ठीक होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  ‘रुपी’च्या सारस्वत बँकेतील विलीनीकरणास रिझव्‍‌र्ह बँकेची मान्यता

राष्ट्रवादीची मोळी विखुरली जाईल?

1999 साली ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तयार झाली, त्यावेळी अनेकजण जोडले गेले. त्यामुळे सरदारांनाच नाही तर अनेक इतर नेत्यांना तयार काम करण्याचं काम राष्ट्रवादीने केलंय. पक्षाने घेतलेला निर्णय पवार साहेबांनी नेहमी मान्य केलाय. 23 जणांची समिती होती, आम्ही निर्णय मागे घेण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांनी मला विचार करायला वेळ हवा असं उत्तर शरद पवार यांनी आम्हाला दिलंय, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

सर्वजण पक्षातील घटनेबाबत राजकीय अर्थ काढतात. मी शरद पवार यांच्याशी अडीच तास घालवले. त्यांनी माझ्या विनंती पुरेशी दाद दिली नाही. आता त्यांनी सांगितलंय की, विचार करायला वेळ हवाय. माझी निष्ठा ही शरद पवार यांच्यासोबत आहेत. मला समोरून आमंत्रणंही आले होते. मात्र, आम्ही कुठं जाण्याचा प्रश्नच येत नाही, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय.

महाविकास आघाडीचं भविष्य काय?

महाविकास आघाडीचा आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाचा संबंध नाही. पवार साहेबांची इच्छा होती की तरुण नेतृत्व तयार करावं. मात्र, अनेकांना मान्य नाही, असा खुलासा देखील जयंत पाटील यांनी केला आहे. भाजपकडे जाण्याचा अनेकांची इच्छा होती, शरद पवारांनी देखील यावर भाष्य केलं होतं, यावर आपली भूमिका काय आहे?, असा सवाल जयंत पाटलांना विचारण्यात आला होता.

हेही वाचा :  बाबरी पाडली तेव्हा फक्त भाजपचीच मंडळी, शिवेसेनेचे कोणीच नव्हते- फडणवीसांचा दावा

आणखी वाचा – Maharastra Politics: वस्ताद एक डाव राखून ठेवतो… शरद पवार राजीनामा मागे घेणार?

पक्षात काही लोकं असू शकतात, ज्यांना भाजपसोबत जाण्याची इच्छा असले.  काही नेत्यांची संख्या असू शकते. मात्र ती फार क्वचित प्रमाणात असेल, माझ्यासमोर कोणी भूमिका मांडली नाही, असं जयंत पाटील म्हणालेत. शिंदे गटाला खूपच कमी प्रतिसाद मिळतोय, असं मला वाटतंय. त्यामुळे त्यांना आगामी निवडणुकीची धाकधूक असेल, असंही ते म्हणतात.

विधानसभेत महाविकास आघाडीत जिंकणार?

जर महाविकास आघाडीने मिळून निवडणूक लढवली, तर 170 ते 180 जागा महाविकास आघाडीला मिळेल, तर 100 च्या आत शिंदे-भाजप गुंडाळली जाईल, अशी भाकित देखील जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलंय.

दरम्यान, कार्यध्यक्षपदाची चर्चा झालीच नाही, अशी माहिती देखील पाटील यांनी मुलाखतीमध्ये दिली आहे. शरद पवार यांनी थांबल्याचा निर्णय घेतला तर हा आज निर्णय सहन करण्याची क्षमता आमच्यात नाही. राज्यस्तरावर पक्षात नेतृत्व अनेक आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …