Jammu and Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये बर्फाचा डोंगर कोसळला; अंगावर काटा आणणारा Video Viral

Avalanche In Kashmir Sonamarg :  पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून जम्मू काश्मिर(Jammu and Kashmir) ओळखले जाते. सध्या येथे जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यांतच आता जम्मू काश्मीरमध्ये बर्फाचा डोंगर कोसळला(Avalanche In Kashmir Sonamarg) आहे. बर्फाचा डोंगर कोसळतानाचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडिओ आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. आणखी काहीजण बर्फाखाली गाडले गेल्याची भिती व्यक्त केली जात. या ठिकाणी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. जम्मू काश्मीरमध्ये थंडीने कहर केला आहे (Cold Wave). 

उत्तरप्रदेशसह हिमाचल आणि जम्मू काश्मिरमध्ये थंडीचा तडाखा वाढला आहे. जम्मू काश्मीर मध्ये जोरदार बर्फवृष्टी होत. हाड गोठवणाऱ्या थंडीत जगणे मुश्लिक झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.  त्यातच आता जम्मू काश्मीरच्या सोनमर्ग भागात भीषण हिमस्खलन झाले आहे. बर्फाचा मोठा कडाच  कोसळला आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.  

जम्मू काश्मिरमध्ये हिमवादळ आले आहे. यामुळेच हा बर्फाचा डोंगर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्रशासनानं या भागात  दक्षतेचा इशारा दिला आहे. स्थानिक रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, बीकन आणि एमईआयएल पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या ठिकाणी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. 

हेही वाचा :  'द कश्मीर फाइल्स' मोफत दाखवणाऱ्यांवर भडकले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, खरा राष्ट्रवाद… | Vivek Agnihotri erupted after the announcement of The Kashmir Files for free abn 97

सध्या जम्मू काश्मिरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटक बर्फवृष्टीचा आंनद घेत आहेत. या  हिमस्खलनाच्या घटनेनंतर अनेक धोक्याच्या ठिकाणी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. तसेच खबरदारी घेण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.  हिमाचल प्रदेशात थंडीची मोठी लाट पसरलीय. शिमला शहरात जोरदार हिमवर्षाव होत असून, इथला पारा घसरलाय. हिमवर्षाव झाल्यानं रस्ता आणि परिसर पांढराशुभ्र झालाय. 

 

भारतात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा

उत्तर भारतात 14 ते 19 जानेवारी या कालावधीत तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.  भारतीय हवामान विभागाने याबाबत इशारा दिला आहे. 16 ते 18 जानेवारीदरम्यान कडाक्याची थंडी असणार आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी तापमानाचा पारा उणे 4 अंश सेल्सिअसवरुन दोन अंशांपर्यंत घसरु शकतो, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

2006 मध्ये थंडीने कहर केला होता

यापूर्वी 2006 मध्ये थंडीने कहर केला होता. यानंतर 23 वर्षातील तिसरी सर्वात भीषण थंडी जाणवत आहे. 2006 मध्ये सर्वात कमी तापमान 1.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.  2013 मध्येही अशाच प्रकारे थंडीचा कडाका जाणवला होता. 
  

हेही वाचा :  Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …