‘Period Panty’ मासिक पाळीत वापरण्याचं प्रमाण का वाढलंय, कसा करावा वापर जाणून घेणे गरजेचे

What Is Period Underwear: मासिक पाळीत रक्तस्राव अधिक होत असेल तर पिरियड पँटीचा वापर करता येतो. मात्र अजूनही अनेक महिलांना याबाबत माहिती नाही. बरेचदा मासिक पाळीसारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत नाही आणि त्यामुळे हायजीन अथवा आरामदायी गोष्टींबाबतही महिलांना पटकन कळत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान टेम्पॉन अथवा मेन्स्ट्रूअल कपप्रमाणे ही पिरियड पँटी आराम देण्याचे काम करते. ही घातल्यानंतर विशेषतः रक्तस्रावाबाबत सतत साशंक राहावं लागत नाही. पण नक्की याचा कसा वापर करावा आणि पिरियड पँटीचे काय फायदे आहेत जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)

​पिरियड पँटी अर्थात पिरियड अंडरवेअर नक्की काय आहे?​

​पिरियड पँटी अर्थात पिरियड अंडरवेअर नक्की काय आहे?​

मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना अधिक आराम मिळावा यासाठी तयार करण्यात आलेली ही पँटी अथवा अंडरवेअर आहे. जगभरात ही पिरियड पँटी आता मासिक पाळीदरम्यान अधिक वापरात येत आहे. मात्र भारतात अजूनही याबाबत जागरूकता झालेली नाही. ही पँटी जरा महाग असली तरीही हायजिनच्या दृष्टीने अनेक महिला या अंडरवेअरला प्राधान्य देत आहेत.

हेही वाचा :  मावळच्या जागेवरुन महायुतीत ओढाताण, राष्ट्रवादी आणि भाजपाचा दावा

​पिरियड अंडरवेअर नक्की कशा पद्धतीचे काम करते​

​पिरियड अंडरवेअर नक्की कशा पद्धतीचे काम करते​

ज्या महिलांना मासिक पाळीच्या दिवस अधिक रक्तस्राव होतो त्या महिलांसाठी पिरियड अंडरवेअर उत्तम पर्याय आहे. ही अंडरवेअर घातल्यानंतर पॅड लावण्याचीही गरज भासत नाही. तसंच ज्या महिलांना व्हाईट डिस्चार्ज अथवा Urine Leak समस्या आहे त्यांच्यासाठीही या पिरियड अंडरवेअरचा फायदा होतो. ही अंडरवेअर वापरल्याने सतत ओलेपणाचा भास होत नाही.

(वाचा – डायबिटीसच्या रूग्णांनी व्हाईट ब्रेड खाणे अयोग्य? काय होते नुकसान घ्या जाणून)

​पिरियड अंडरवेअरचा वापर कसा करावा​

​पिरियड अंडरवेअरचा वापर कसा करावा​

पिरियड अंडरवेअरवर मुलायम कपडा लावण्यात येतो. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात योनीमार्गाजवळ रॅशेस होत नाहीत. या अंडरवेअरमध्ये लिक्विड शोषून घेण्यासाठी आधीच आतमधून पॅड लावण्यात आलेले असते. जे स्ट्रिप्सच्या मदतीने टिकून राहाते. गरज पडल्यास, महिला ही स्ट्रीप बाजूलादेखील काढू शकतात.

(वाचा – लहान वयातच मासिक पाळी थांबविण्याची मेन्स्ट्रूअल सप्रेशन प्रक्रिया नक्की काय आहे, कोणासाठी आहे ही ट्रीटमेंट)

​सामान्य अंडरवेअरप्रमाणे उपयोग​

​सामान्य अंडरवेअरप्रमाणे उपयोग​

मासिक पाळीच्या दिवसात सामान्य अंडरवेअरप्रमाणेच याचा उपयोग करता येतो. यामधून अजिबात Leakage होत नाही. याशिवाय पॅड हलण्याचा अथवा त्यातून रक्त बाहेर येण्याचा धोकाही राहात नाही. तसंच ज्या महिलांना अधिक रक्तस्राव होतो त्या महिला यासह वरून अजून एक पॅडचादेखील उपयोग करून घेऊ शकतात. जे या अंडरवेअरसह बाजारात उपलब्ध असतात. तज्ज्ञांच्या मते या पिरियड पँटीचा उपयोग करणं अतिशय सोपं आणि आरामदायी आहे.

हेही वाचा :  'होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभरवेळा अस्वस्थ राहीन' शरद पवारांचं मोदींना सडेतोड प्रत्युत्तर

(वाचा – Fact Check: मासिक पाळीनंतर चेहऱ्यावर येते चमक, काय वाटते तुम्हाला)

​पिरियड अंडरवेअरचे फायदे ​

​पिरियड अंडरवेअरचे फायदे ​
  • मासिक पाळीच्या दिवसात रक्तस्रावाचा त्रास होत नाही
  • प्रवास करताना याचा अधिक चांगला उपयोग करून घेता येतो
  • मासिक पाळीच्या दिवसात येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका होते
  • ज्या महिलांना अधिक रक्तस्रावाचा त्रास आहे त्या बिनधास्त याचा वापर करून फिरू शकतात

​कशी करावी पिरियड अंडरवेअरची स्वच्छता?​

​कशी करावी पिरियड अंडरवेअरची स्वच्छता?​

पिरियड अंडरवेअरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही स्वच्छ करण्यासाठी अधिक मेहनतीची गरज भासत नाही. या अंडरवेअरवर डिस्पोजेबल लावण्यात आले आहे. ज्यामुळे अगदी सहजपणाने स्वच्छता करण्यात येते. एकदा वापरल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ केल्यास, पुन्हा वापरण्यास त्रास होत नाही. मात्र याची स्वच्छता नीट न झाल्यास इन्फेक्शनचा धोका संभवतो.

पिरियड अंडरवेअरची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि अधिक हायजीनसाठी याचा वापर करून पाहा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …