दोनदा युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन ईश्वर्या बनली IAS अधिकारी !

UPSC Success Story : युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण ईश्वर्या रामनाथन या IAS अधिकारी हिचा संपूर्ण प्रवास हा अनोखा आहे. जिने वयाच्या चोवीसाव्या वर्षी दोनदा युपीएससीची परीक्षा यशस्वीपणे पास केली आहे.‌वाचा, तिच्या यशाची ही कहाणी…

कुड्डालोरच्या किनारी जिल्ह्यातून आलेल्या, ईश्वर्याने लहानपणापासूनच पूर, चक्रीवादळ आणि अतिवृष्टी यासारख्या विविध नैसर्गिक आपत्ती पाहिल्या आहेत. विशेषतः २००४च्या सुनामीचा तिच्यावर खूप मोठा परिणाम झाला. त्या काळातील कलेक्टर गगनदीपसिंग बेदी यांच्या कार्याची तिच्यावर छाप पडली. त्यानंतर तिने देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा निर्णय घेतला. ईश्वर्या रामनाथन ही भारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहे. तिने चोवीस वर्षांची असताना २०१९ ची युपीएससीची परीक्षा ऑल इंडिया ४७व्या रँकसह (AIR) उत्तीर्ण केली. सध्या, ती तामिळनाडूच्या तिरुवल्लूरमध्ये उपजिल्हाधिकारी, SDM म्हणून काम करते.

आईएएस अधिकारी बनणे हे तिचे बालपणीचे स्वप्न होते.तिच्या आईने ईश्वराला कलेक्टर होण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. ईश्‍वर्याच्या आईच्या प्रभावाने तिला तिच्या संपूर्ण प्रवासात प्रेरणा दिली.

ऐश्वर्याने २०१७ मध्ये चेन्नईच्या अण्णा विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. तिने तिच्या महाविद्यालयीन दिवसात युपीएससीची परीक्षेची तयारी सुरू केली आणि UPSC कोचिंग देखील घेतले. तिच्या पहिल्या प्रयत्नात, तिची अखिल भारतीय रँक ६३० होती आणि तिने रेल्वे लेखा सेवा मिळवली. पण तिचे आय.ए. एस अधिकारी होण्याचे स्वप्न खुणावत होते. तिने आयएएस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा जोमाने सराव, तयारी आणि प्रश्नपत्रिकांचा सराव सुरू केला. २०१९ मध्ये तिच्या दुसर्‍या प्रयत्नात, IAS अधिकारी होण्याचे तिचे ध्येयवत स्वप्न साकार झाले.

हेही वाचा :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत बंपर भरतीची जाहिरात प्रसिद्ध | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …