IPL: 29 मे रोजी खेळवला जाऊ शकतो आयपीएल 2022 चा अंतिम सामना,वाचा कधीपासून सुरु होणार महासंग्राम

IPL 2022 Dates : संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागून असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यांना काही दिवसांत सुरुवात होणार आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) चा अंतिम सामना 29 मे रोजी खेळवला जाऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. तर आयपीएल 2022 ला मार्चच्या अखेरच्या आठवड्यात सुरुवात होऊ शकते. यंदाच्या सीजनमध्ये 70 ग्रुप स्टेज सामने खेळवले जाऊ शकतात.

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार 55 सामने मुंबई आणि 15 सामने पुणे येथे खेळवले जाणार आहेत. बीसीसीआय याबाबत 24 फेब्रुवारी रोजी अंतिम निर्णय घेऊ शकते, अशी माहितीही समोर येत आहे. क्रिकबज वेबसाईटच्या माहितीनुसार आयपीएल 2022 चे 55 सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबोर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियम याठिकाणी खेळवले जाऊ शकतात. तर पुण्याच्या एमसीए इंटरनेशनल स्टेडियममध्ये 15 सामने खेळवले जाऊ शकतात. आयपीएलची फायनल 29 मे ला तर सुरुवात 26 किंवा 27 मार्च रोजी होऊ शकते. याबाब अधिकृत कोणतंही वक्तव्य अजून समोर आलेलं नाही.

यंदा 10 संघात होणार क्रिकेटचं महायुद्ध

आयपीएलमध्ये यंदा आठच्या जागी 10 संघ खेळवले जाणार आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायटंस या दोन संघाना यंदा आयपीएलमध्ये एन्ट्री देण्यात आली आहे. नुकताच आयपीएलचा महालिलावही पार पडला. आयपीएलच्या संपूर्ण लिलाव प्रक्रियेत एकूण 5 अब्ज, 51 कोटी आणि 70 लाख रुपये खर्च झाले. यादरम्यान लखनौ सुपर जायंट्सने 21 खेळाडूंसाठी संपूर्ण 90 कोटी रुपये खर्च केले. विशेष म्हणजे, लखनौ फ्रँचायझीने बाकीच्या संघांच्या तुलनेत कमी खेळाडूंना खरेदी केलं. लखनौ सुपर जायंट्सनं केएल राहुलची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय राहुल व्यतिरिक्त फ्रँचायझीनं मार्कस स्टॉयनिस आणि रवी बाश्नोई यांनाही लिलावापूर्वी साइन केलं होतं.

हेही वाचा :  IPL 2022 : यंदातरी 'आयपीएल'च्या सुरक्षेचे पैसे मुंबई पोलिसांना मिळणार का?

ईशान किशान सर्वात महागडा खेळाडू 

IPL 2022 च्या लिलावात ईशान किशन हा सर्वात महागडा विकणारा खेळाडू होता. यष्टिरक्षक, फलंदाज असलेला ईशान किशनला मुंबई इंडियन्सने (MI) 15.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. यासह, ईशान किशन हा आयपीएल लिलावात दुसरा सर्वात महाग विकला जाणारा भारतीय खेळाडू बनला आहे. युवराज सिंह हा लिलावात विकला जाणारा सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे. 2016 च्या लिलावात युवराजला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 16 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. IPL 2022 च्या लिलावात दीपक चहर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) दीपक चहरला 14 कोटींना खरेदी केलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …