International Women’s Day 2022: गुगलची विद्यार्थिनींसाठी गर्ल हॅकाथॉन

महिला दिनापूर्वी (International Women’s Day 2022) गुगल इंडियाच्या विद्यार्थिनींसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. याअंतर्गत गुगल कंपनीत इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आणि रोख बक्षीस मिळणार आहे. गुगल इंडिया वुमन कोडर्स – गर्ल हॅकाथॉन स्पर्धा विद्यार्थिनींसाठी आयोजित करत आहे. त्याअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बिल्ड युवर फ्युचर विथ गुगल या थीमवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गर्ल हॅकाथॉनसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थिनी ९ मार्च २०२२ पर्यंत buildyourfuture.withgoogle.com च्या माध्यमातून गर्ल हॅकाथॉनच्या अधिकृत वेबसाइटवर आपली नोंदणी करू शकतात. ही स्पर्धा केवळ संगणक विज्ञान आणि आयटी विषयातील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभियांत्रिकी पदवी कार्यक्रमात नोंदणी केलेल्या विद्यार्थिनींसाठीच आहे. ही स्पर्धा १९ मार्च ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यात आयोजित केली जाईल.

नोकरीची मुलाखत आणि रोख बक्षीस जिंकण्याची संधी
Google India च्या मते, गर्ल हॅकाथॉन भारतीय विद्यार्थिनींना त्यांचे कोडिंग कौशल्य एक टीम म्हणून दाखवण्याची आणि रीअल-टाइम तांत्रिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्जनशील उपायांवर काम करण्याची संधी देईल. ही स्पर्धा फक्त विद्यार्थिनींपुरती मर्यादित असून त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना स्वतःचा तीन सदस्यीय संघ तयार करावा लागेल. विजेत्या संघांना Google वर नोकरीची मुलाखत आणि रोख बक्षिसे जिंकण्याची संधी देखील मिळेल. ही स्पर्धा तीन टप्प्यात होणार असून सहा आठवडे चालणार आहे.

हेही वाचा :  टिम इंडियाचा फिनिशर हार्दिक पांड्याचे शिक्षण फारच कमी, ऐकून तुम्हाला विश्वास नाही बसणार

JEE MAIN 2022: पहिल्या दिवशी ४० हजारांहून अधिक अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

IGNOU जानेवारी सत्राच्या नोंदणीला मुदतवाढ
International women’s Day 2022: आर्मी टेक्निकल कोअरमध्ये महिलांना प्रवेश

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …