Instagram Reels : तुम्हालापण इन्स्टाग्रामवरुन पैसे कमावायचे आहेत? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली : How to Earn Money from Instagram : आजकाल कितीतरीजण फक्त इन्स्टाग्रामवरुन लाखो रुपये कमवत आहेत, ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळत आहे. जर तुम्ही इन्स्टाग्रामवरून कमाई करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या मार्गांबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही सहजपणे इन्स्टावरुनही तगडी कमाई करू शकता. सोशल मीडियाचा वापर करून तुम्हीही सहज खिसा भरू शकतो.

इन्स्टाग्राम रील्स

इन्स्टाग्राम रीलच्या मदतीने तुम्ही सहज कमाई करू शकता. तुमची एखादी रील व्हायरल झाली तर, ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. म्हणूनच तुम्हाला आधी रीलबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. अनेक इन्फ्लूएन्सर्स याच्या मदतीने कमाई करत आहेत. तुम्हीही याच्या मदतीने चांगली कमाई करू शकता. तुम्हाला फक्त कंटेटकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

बिझीनेट अकाउंट
तुमच्याकडे बिझीनेस अकाउंट असले तरीही तुम्ही मोठी कमाई करू शकता. पण या खात्यावर तुम्ही सतत काम केले तरच तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला स्वतंत्र जाहिराती देखील मिळू शकतात आणि जाहिरातीच्या मदतीने तुम्ही मोठी कमाई करु शकणार आहात. पण नंतर तीच गोष्ट येते की यातून कमाई करण्यासाठी तुमचा कंटेट चांगला असणं गरजेचं आहे.

व्हायरल पोस्ट
तुम्ही सोशल मीडियावरून कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी व्हायरल पोस्ट ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. कारण ज्या युजर्सच्या पोस्ट खूप व्हायरल होतात तेच थेट लोकांकडून कमाई करत आहेत. त्यामुळे तुमच्या पोस्ट व्हायरल झाल्या तरच तुम्ही चांगली कमाई कराल. कंटेट हटके आणि भारी असल्यास पोस्ट नक्कीच व्हायरल होऊ शकते. मग फोटो, व्हिडीओ काही व्हायरल झाले तरी तुम्हाला फायदा होतो.

हेही वाचा :  अमेरिकन गायिका सेलेना गोमेजचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …