Instagram रील्स पाहण्याचं वेड लागलंय?, या सोप्या टिप्सनं स्क्रीन टाइम करा कमी

सध्या जमाना डिजिटलचा आहे. आज अनेक जण डिजिटली अॅक्टिव राहणे पसंत करतात. सोशल वेबासाइट्स आणि प्लॅटफॉर्मन्स एक न्यू नॉर्मल बनले आहे. इन्स्टाग्रामने तर अनेकांना अक्षरशः वेड लावलं आहे. मुली, महिलापासून मुलं आणि वयस्कर पुरूषही इन्स्टाग्राम रिल्सच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. लाइकसाठी वेगवेगळे रिल्स बनवले जात आहेत. अनेक जण तास न तास इन्स्टाग्रामवर घालवत आहेत. तुम्ही सुद्धा यातील एक असाल तसेच तुम्हाला स्क्रीन टाइम कमी करायचा असेल तर या ठिकाणी काही खास टिप्स दिल्या आहेत. जाणून घ्या डिटेल्स.

iPhone वर Instagram चा टाइम लिमिट कसा सेट कराल
आपल्या आयफोनमधील सेटिंग ओपन करा.
खाली स्क्रॉल करा. स्क्रीन टाइमवर टॅप करा.
जर तुमचा स्क्रीन टाइम आधीच सेट केला नसेल तर Turn On Screen Time वर टॅप करा. याला सेट करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करा.
एकदा स्क्रीन टाइम इनेबल केल्यानंतर तुम्हाला आपल्या डिव्हाइसच्या नावावर टॅप करावे लागेल.
App Limits अंतर्गत Add Limit वर टॅप करा.
पुन्हा Social Networking वर किंवा All Apps & Categories ला सिलेक्ट करा.
यानंतर इंस्टाग्राम सिलेक्ट करा.
आपल्या हिशोबानुसार, टाइम सिलेक्ट करा.
पुन्हा Add वर टॅप करा.

हेही वाचा :  'माझा भाऊच माझा नवरा आहे'; महिलेने सांगितलं विचित्र फॅमेली सिक्रेट! जाणून घ्या नेमका प्रकार काय

वाचाः फक्त १४९९ रुपयात खरेदी करा स्मार्ट टीव्ही, फ्लिपकार्ट देत आहे शानदार ऑफर

Android वर Instagram ची टाइम लिमिट कसे सेट कराल
सेटिंग्स ओपन करा. नंतर स्क्रॉल डाउन करा आणि Digital Wellbeing & Parental Controls वर टॅप करा.
Digital Wellbeing सेटिंग्स वर जा आणि Dashboard किंवा Your Digital Wellbeing tools वर जा.
यानंतर इंस्टाग्राम अॅपवर टॅप करा.
Set Timer किंवा App Timer वर टॅप करा.
यानंतर टाइम सेट करा.
पुन्हा ओके वर टॅप करा.

वाचाः Oneplus 12 आणि Ace 2 Pro ची स्पेसिफिकेशन्स लीक, हे फीचर्स मिळतील

वाचाः 100 मेगापिक्सल कॅमेरा, 256 जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …