Independence Day 2023: यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम तुम्हाला माहितीये का?

 Independence Day 2023: 15 ऑगस्ट 2023रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर यंदा 77वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. लाल किल्ल्यावरून (Red Fort) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) जनतेला संबोधित करणार असून त्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं आहे. पण तुम्हाला यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम माहितीये का? (Independence Day 2023 Theme)

काय आहे यंदाची थीम

प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव एक थीमवर आयोजित करण्यात येतो. या थीमनुसारच सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 2023 मध्ये,  “आझादी का अमृत महोत्सव” या विशेष कार्यक्रमाचा भाग म्हणून नेशन फर्स्ट, ऑल्वेज फर्स्ट “राष्ट्र प्रथम, नेहमीच प्रथम” ही थीम असणार आहे.
त्यामुळं सर्व कार्यक्रम हे या थीमनुसारच आयोजित केले जाणार आहेत. या थीमचा अर्थ असा आहे की, भारतीयांना एकजूट होऊन राष्ट्राला अग्रेसर ठेवून पुढे घेऊन जायचे आहे. देशाच्या विविध प्रकारच्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी सरकारने अनेक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा :  Brainvita Game : ब्रेनविटा खेळाचा शोध भारतातच लागला; महाराष्ट्रातील 1100 वर्षांपूर्वीच्या प्राचीन मंदिरात सापडले पुरावे

मेरी माती मेरा देश

यंदाच्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंग्याची दुसरी आवृत्तीही सुरू झाली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनापूर्वी ‘मेरी माती मेरा देश’ अभियानही सुरू करण्यात येणार असून, त्यामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 

अमृत कलश यात्रा

९ ऑगस्ट रोजी ‘मेरी माती मेरा देश’ ही मोहिम सुरू झाली आहे. तर, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ही मोहिम संपणार आहे. या मोहिमेअंतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात येणार असून त्यामध्ये हुतात्म्यांच्या गावातील माती आणि रोपे कलशात दिल्लीत आणण्यात येणार असून राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळील अमृत वाटिकेत ही रोपे लावण्यात येणार आहेत.

दरम्यान यंदा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध राज्यातून 72 जोडप्यांना बोलवण्यात येणार असून त्यात मनरेगा योजनेतील 50 जोडप्यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय 5500 लोकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जरांगे पाटील आणि भुजबळ वाद विकोपाला! भाषेचा दर्जा घसरला; समाजावर काय होणार परिणाम?

Jarange and Bhujbal Dispute: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातला वाद …

मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा! ‘या’ वस्तू आणि सेवा GST कक्षेतून बाहेर; निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा

GST Council Meeting: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच 53 वी जीएसटी परिषद पार पडली. …