IND vs WI, 2nd T20 Live Blog: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसऱ्या टी20 सामन्यातील प्रत्येक अपडेट्स

IND vs WI 2nd T20 LIVE: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात टी20 मालिका सुरु असून भारताने पहिला टी20 सामना (1st T20match) जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता आज दुसरा टी20 सामना (2nd T20 Match) कोलकात्याच्या ईडन गार्डन्स (Eden Garden Stadium) या क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारत आता टी20 मालिकेतील आजचा सामना जिंकून मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.  

कोलकात्याच्या ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल असते. या खेळपट्टीवर फलंदाजांना अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. आज मैदानावर धुके असण्याची शक्यता आहे. यामुळं नाणेफेक जिंकणार संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. शुक्रवारी येथे हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे पावसाची शक्यता नसल्यानं सामना पूर्ण खेळला जाईल. येथील तापमान कमाल 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. तर, 13 किलोमीटर प्रतितास हवा वाहण्याची शक्यता आहे.

संभाव्य अंतिम 11

भारतीय संघ (India’s T20I squad) –

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल

वेस्ट इंडीज संघ (WI T20I squad) –

ब्रँडन किंग, काईल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकिपर), रोवमॅन पोवेल, कायरन पोलार्ड (कर्णधार), रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, अकेल होसेन, ओडेन स्मिथ, फॅबियन अॅलन, शेल्डॉन कॉट्रेल

तिसऱ्या सामन्यात प्रेक्षकांना परवानगी?

तिसरा टी-20 सामना 20 फेब्रुवारी रोजी कोलकात्याच्याच ईडन गार्डन येथे होणार आहे. दरम्यान या सामन्यात प्रेक्षकांना परवानगी मिळणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील या टी-20 सामन्यात प्रेक्षकांना परवागनी देण्यात यावी, अशी विनंती बंगाल क्रिकेट असोसिएशननं बीसीसीआयकडं केली होती. त्यानंतर बीसीसीआयनं अखेरच्या टी-20 सामन्यात 20 हजार प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय. 

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

IND vs ENG, 5th Test : सिराज-बुमराहचा भेदक मारा, पुजाराचं अर्धशतक, भारताकडे 257 धावांची आघाडी

IND vs ENG, 5th Test : बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) सुरु असलेल्या पाचव्या …

महिला हॉकी विश्वचषकातील भारत- इंग्लंडमधील समाना अनिर्णित, वंदना कटारियाने केला एकमेव गोल

FIH Women’s Hockey WC : महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेतील भारत-इंग्लंडमधील सामना अनिर्णित राहिला आहे. भारताकडून …