शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे डॉक्टर-इंजिनियर होण्याचे स्वप्नही लवकरच पूर्ण होणार आहे. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिल्ली सरकार त्यांना मदत करणार आहे. दिल्ली सरकारने सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना नीट आणि जेईईसारख्या उच्चस्तरीय प्रवेश परीक्षांसाठी मोफत कोचिंग देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या योजनेची माहिती दिली आहे.
पहिल्या वर्षी सहा हजार मुलांना प्रशिक्षण देणार
पहिल्या वर्षी दिल्लीतील सरकारी शाळांमधून निवडलेल्या अकरावी आणि बारावीच्या ६ हजार मुलांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी, शिक्षण संचालनालयाने (DOE) इंजिनीअरिंग, मेडिकल आणि इतर टेक्निकल क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अवंती फेलोसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती सिसोदिया यांनी दिली. निवडलेल्या विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी चाचणी मालिकेद्वारे विनामूल्य प्रशिक्षण, या परीक्षांसाठी आवश्यक शैक्षणिक समर्थन आणि तयारीदरम्यान नियमित काऊन्सेलिंग केले जाईल असेही ते म्हणाले.
पायलट प्रोजेक्टमध्ये आश्चर्यकारक परिणाम
दिल्लीचे शिक्षण मंत्री सिसोदिया म्हणाले की, अनेक मुले डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहतात पण त्यांच्या पालकांना महागडे कोचिंग परवडत नाही. यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर काही शाळांमध्ये हा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता आणि त्याचे चांगले परिणामही समोर आले आहेत. या कार्यक्रमांतर्गत एससी आणि एसी प्रवर्गातील १६० हून अधिक मुलींना तज्ञांकडून नीट परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता हे चित्र बदलण्यासाठी दिल्ली सरकार सज्ज झाले आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या
