IND vs ENG : भारतासमोर इंग्लंडचं आव्हान कोण गाठणार फायनल? सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs ENG Score Live : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील (T20 World Cup 2022) दुसरा सेमीफायनलचा (IND vs ENG Semifinal 2) सामना आज भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. एकीकडे पाकिस्तानने न्यूझीलंडला (Pakistan vs New Zealand) मात देत फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये पाकिस्तानशी भिडणार आहे. दोन्ही संघासाठी आजचा सामना करो या मरो असा असणार असून दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार हे नक्की!

टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड (India vs England) संघ यांच्यात आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 22 पैकी 12 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. सामना होणाऱ्या अॅडलेडची (Adelaide Cricket Stadium) खेळपट्टी (Adelaide Pitch Report) फलंदाजीच्या दृष्टीने चांगली मानली जाते. पण सोबतच गोलंदाजांनाही फायदा मिळू शकतो.  येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 180 आहे, इतर मैदानांच्या तुलनेत ही बरीच जास्त आहे. फलंदाजांनी चांगली सुरुवात केल्यास ते सहज मोठी धावसंख्या उभारु शकतात. पण गोलंदाजही सुरुवातीच्या षटकातच विकेट्सची आशा करतील. अॅडलेड ओव्हलचे मैदान मोठे असल्याने गोलंदाजांना फायदा होऊ शकतो.  

हेही वाचा :  न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानच्या शादाबचं अफलातून क्षेत्ररक्षण, रनआऊटचा 'हा' व्हिडीओ पाहिलात का?

कसे आहेत टी20 विश्वचषक 2022 साठी दोन्ही संघ?

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह

राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर 

इंग्लंडचा संघ 

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, अॅलेक्स हेल्स.

राखीव खेळाडू : लियाम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, टायमल मिल्स.

अशी असू शकते भारताची अंतिम 11

सलामीवीर – रोहित शर्मा, केएल राहुल 

मिडिल ऑर्डर फलंदाज – विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या

ऑलराउंडर– अक्षर पटेल, आर अश्विन

गोलंदाज – अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …