Delhi Girl Accident : अंजलीच्या लैंगिक शोषणाबाबत मोठी अपडेट, पोस्टमार्टममध्ये आली ‘ही’ बाब समोर

Kanjhawala Girl Postmortem Report: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत नवीन वर्षाच्या पहिल्याच 20 वर्षीय तरूणीवर अत्याचार झाल्याने दिल्लीसह (Kanjhawala Girl Accident) संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात एकापाठोपाठ एक नवीन खुलासे होत आहेत. या घटनेदरम्यान मृत अंजली सिंह स्कुटीवरून निघाली तेव्हा तिची मैत्री तिच्यासोबत होती. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने पोलिसांना जबाब दिला असून या घटनेतील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. त्यातच आता आणखी एक झटका देणारी माहिती समोर आली  असून अंजलीच्या लैंगिक शोषणाबाबत मोठा खुलासा झाला आहे. 

दिल्लीतील सुलतानपुरी येथील रस्ता अपघातात नवा खुलासा झाला आहे. घटनेच्या दिवशीचे अंजलीचे (Girl Postmortem Report) सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. नवीन वर्षाच्या पार्टीनंतर अंजली पहाटे 1.45 वाजता हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहे. एवढेच नाही तर अंजलीसोबत तिची मैत्रीणही तिच्या सोबत दिसत आहे. स्कूटी तीची मैत्रीण चालवत आहे तर अंजली मागे बसली आहे. काही वेळाने अंजली म्हणते की ती स्कूटी चालवणार. यानंतर ती समोरून स्कूटी चालवू लागते आणि तिचा मैत्रीण मागे बसलेली दिसतेय. यानंतर काही वेळातच त्याची स्कूटी आरोपीच्या कारला धडकते. अपघातादरम्यान दुसरी मुलगी किरकोळ जखमी होऊन ती आपल्या घरी गेली. मात्र अंजलीचा पाय गाडीच्या एक्सलमध्ये अडकला, त्यानंतर कारमध्ये बसलेल्या आरोपींनी अंजलीला 13 किमीपर्यंत ओढत नेले. 

हेही वाचा :  Shraddha Murder Case: श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबला पश्चाताप की भीती? म्हणून त्याने...

वाचा : आज टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सामना, कधी आणि कुठे पाहता Match? 

या अपघातादरम्यान पाच आरोपीनी अंजलीवर लैंगिक शोषणा केले की नाही यावर शंका व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता तिच्यावर कोणतेही लैंगिक अत्याचार झाले नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांना समोर आली आहे. दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी अंजलीचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.

मुलीवर लैंगिक अत्याचार नाही

सुलतानपुरी बलात्कार प्रकरणातील दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीच्या अंजलीचे पोस्टमार्टम केल्यानंतर पोलिसांना कळले आहे की, तरुणीवर कोणतेही लैंगिक अत्याचार झाले नव्हते. अहवालानुसार, मृतांच्या खाजगी भागावर कोणत्याही जखमेच्या खुणा किंवा जखमा नाहीत. मात्र, शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नसून, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी अनौपचारिकपणे पोलिसांना माहिती दिली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दिल्लीतील कांजवाला येथे एका तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापजड दिसून आला. पोलिसांनी तपास केला असता घटनास्थळापासून काही अंतरावर अपघातग्रस्त असलेली एक स्कूटीही पोलिसांना आढळून आली. स्कूटीच्या क्रमांकाच्या आधारे तरुणीची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी तपासाअंती कार जप्त केली आणि 1 जानेवारीच्या रात्री उशिरापर्यंत त्या पाचही आरोपींना अटक केली. या तपासाअंतर्गत पोलिसांनी दावा केला की, कारमध्ये असलेल्या 5 तरुणांनी एका तरुणीला धडक दिली. त्यानंतर तिला 4 किमीपर्यंत रस्त्यावर ओढले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा :  "मला वाटतं की एखाद्या जाहिरातीमुळे..."; शिंदे गटाच्या 'त्या' जाहिरातीवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

मात्र, नंतर पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पीडितेला कारमध्ये 13 किमीपर्यंत ओढले होते. पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आरोपींनी कबूल केले की ते दारूच्या नशेत होते, अशा परिस्थितीत अपघातानंतर मुलगी त्यांच्या कारमध्ये अडकली होती हे त्यांना माहित नव्हते. एवढेच नाही तर आरोपींनी सांगितले की, मुलीचा मृतदेह गाडीत अडकल्याचे समजताच ते तेथून पळून गेले. मृत तरुणीच्या कुटुंबीयांनीही पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …