सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाचं मोठं विधान; म्हणाले “लोकांच्या चपला…”

Rahul Kanal on Sushant Singh Rajput: ठाकरे गटाला शनिवारी एक मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे युवासेना प्रमुख राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी पक्षाला रामराम ठोकला. राहुल कनाल यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, शिंदे गटात प्रवेश करताच राहुल कनाल यांनी सुशांत सिंग (Sushant Singh) आणि दिशा सालियन (Disha Salian) कथित आत्महत्येप्रकरणी मोठं विधान केलं आहे. राहुल कनाल यांनी सुशांत सिंग आणि त्याची मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येवर भाष्य करत सविस्तरपणे तपास करण्याची मागणी केली आहे.

सुशांत सिंग आणि दिशा सॅलियन प्रकरणात भाजपा नेते नारायण राणे, नितेश राणे यांनी वारंवार आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरेंचा या प्रकरणांशी संबंध असून आपल्याकडे पुरावे असल्याचे दावेही त्यांनी अनेकदा केले आहेत. राणे कुटुंबीयांनी जाहीरपणे पत्रकार परिषदा घेत आदित्य ठाकरेंवर आरोप केले असले तरी अद्याप याप्रकरणी एकही पुरावा समोर आलेला नाही. पण आता आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयानेच या प्रकरणावर भाष्य केल्याने प्रकरण पुन्हा तापण्याची चिन्हं आहेत. 

हेही वाचा :  घाणेरडा कोलेस्ट्रॉल आणि त्वचेचे आजार होणार छुमंतर फक्त हे उपाय करा

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राहुल कनाल यांनी प्रसासमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, “सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणी तपास सुरु असल्यानेच राहुल कनालने शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा अनेकजण करत आहेत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आहे की, याप्रकरणी सविस्तर चौकशी करा. जे लोक माझ्यावर आरोप करत आहेत त्यांना चौकशीतून उत्तर दिलं जावं. जर चौकशीत माझं नाव आलं तर मी त्यांच्या चपलांचा मार खाण्यास तयार आहे”. 

गतवर्षी प्राप्तिकर विभागाने राहुल कनाल यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. राहुल कनाल आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवासेनेच्या कोअर कमिटीचा भाग होते. राहुल कनाल यांच्या पक्षप्रवेशासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे तसंच इतर आमदार उपस्थित होते. 

हेही वाचा :  महिला दिनाचे औचित्य साधून आसाराम बापूंच्या समर्थनार्थ मोर्चा, महिला म्हणतात बापू…

राहुल कनाल यांनी सुशांत सिंग आणि दिशा सॅलियन प्रकरणी भाष्य केलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘रिपब्लिक’शी बोलताना त्यांनी याप्रकरणी नक्कीच तपास केला जाईल असं आश्वासन दिलं आहे. सध्याची स्थिती काय आहे? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “वास्तव काय आहे याची माहिती घेतली जाईल. त्यांनी मागणी केली असून निश्चितपणे चौकशी केली जाईल”.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस याप्रकरणी जबाब नोंदवत असून, अद्याप हे प्रकरण बंद करण्यात आलेलं नाही अशी माहिती दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणांची चर्चा सुरु झाली होती.

28 वर्षीय दिशा सॅलियनने (Disha Salian) कथितपणे 8 जून 2020 रोजी मालाडमधील (Malad) एका उंच इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली होती. यानंतर 6 दिवसांनी 14 जूनला अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा (Sushant Singh Rajput) त्याच्या फ्लॅटमध्ये मृतदेह आढळला होता.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …