अत्यंत साध्या लुकमध्ये खुशी कपूरने चोरलं चाहत्यांचं काळीज, नाकीडोळी दिसली श्रीदेवीची झलक

दिवंगत आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री sridevi आणि boney Kapoor ची लहान मुलगी Khushi Kapoor. श्रीदेवीच्या दोन्ही लेकी जान्हवी आणि खुशीला सेलिब्रिटी आणि बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळख आणि वलय लाभलं. श्रीदेवीच्या जाण्यानंतर अर्थातच त्यांच्या दोन्ही मुलींविषयीची बॉलिवूड आणि माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली. श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवी कपूरने 2018 मध्ये धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

त्यानंतर घोस्ट स्टोरीज, रूही, गुंजन सक्सेना या सिनेमांमध्ये ती दिसली. तर खुशी कपूर इंटरनेट सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्ध आहे. बॉलिवूडसोबतच सोशल मीडियावर खुशी कपूरचे फॅन फॉलोइंग प्रचंड मोठे आहे. त्यामुळे ती जिथे कुठे दिसेल तिथे चाहत्यांसोबतच पापराझीही तिचे फोटो क्लिक करण्यापासून स्वत:ला आवर घालू शकत नाहीत. अलिकडेच ती एअरपोर्टवर अत्यंत कुल लुकमध्ये दिसून आली. (फोटो सौजन्य :- योगेन शाह, इंस्टाग्राम – khushi05k)

स्वेटशर्ट लुक

स्वेटशर्ट लुक

एयरपोर्टवर स्पॉट करण्यात आलेल्या खुशी कपूरने यावेळी पीच कलरचे स्वेटशर्ट आणि त्याला मॅचिंग अशी ALO ब्रॅंडची पॅंट परिधान केली होती. या स्वेटशर्टचा गळा गोल व बंद पॅटर्नमध्ये होता तर संपूर्ण सेट अगदी आरामदायक मऊशार असा होता. या आऊटफिटमध्ये तिने खळखळून हसत पोझ देत चाहत्यांचे मन खुश केले.

हेही वाचा :  Weather News : मान्सूनपूर्व पाऊस आजही बरसणार; पाहा Maharashtra तील कोणत्या भागाला बसणार तडाखा

(वाचा :- कियारा अडवाणीपेक्षा सुंदर आहे तिची जाऊबाई, प्रत्येक फोटोत झळकतोय ग्लॅमर व आग, कियाराला मागे टाकून स्वत: चर्चेत)​

ज्वेलरी

ज्वेलरी

या मॉर्डन व सिंपल आऊटफिटवर तिने कोणतीही एकस्ट्रा ज्वेलरी परिधान केली नव्हती. गळ्याची सोन्याची नाजूक चेन, कानात सोन्याच्या गोल नाजूक रिंगा इतकीच मोजकी ज्वेलरी घालून ती घराबाहेर पडली होती.
(वाचा :- अबब, 2 तोळ्याच्या हाराएवढ्या किंमतीचा ड्रेस घालून आलिया भट्टची हवा, पिंक लुकमधील डॉलच्या चार्मवर चाहते घायाळ)​

शूज आणि मेकअप

शूज आणि मेकअप

सफेद आणि ग्रे कॉम्बिनेशमधील स्पोर्ट शुज यावेळी खुशीच्या पायांत दिसून आले ज्याने लुक कम्प्लिट करण्यास मदत केली. या लुकवर खुशीने नो मेकअप लुकच ठेवला होता. केस हेअर क्लिपच्या सहाय्याने वर बांधले होते. याशिवाय तिच्या हातात व्हर्टिकल नक्षीकाम केलेली ब्लॅक अँड व्हाईट बॅग सुद्धा दिसून आली.
(वाचा :- कियारा-कतरिना सोडा, लखलखत्या निळ्याशार साडीतील ही अप्सरा बघा,पाण्याहून नितळ सौंदर्य व काळजाचं पाणी करणा-या अदा)​

शमिता शेट्टीचा ओव्हरसाईज शर्टमध्ये जलवा

शमिता शेट्टीचा ओव्हरसाईज शर्टमध्ये जलवा

शिल्पा शेट्टीची बहिण खूपच ग्लॅमरस आहे पण ती नेहमीच साध्या सिंपल आणि कम्फर्टेबल लुकमध्येच अडकलेली दिसून येते. पण तरीही ती प्रत्येक लुकमध्ये ग्लॅमरसचा तडका असा काही अॅड करते की तिचा प्रत्येक लुक हिट झालाच पाहिजे. या एअरपोर्टवरील लुकमध्ये शमिताने ब्लू कलरचा ओव्हरसाईज शर्ट आणि त्यावर मॅचिंग डेनिम घातली आहे. पण अनेकांची नजर त्या डिस्ट्रेस्ड डेनिमवरच खिळून राहिली. कारण अशा पद्धतीचे कपडे निवडताना खरंच खूप काळजीपूर्वक निवडावे लागतात नाहीतर फॅशनच्या नावाखाली ट्रोल केलं जाण्याची शक्यता असते, पण शमिताने हे अगदी छान व कॉन्फिडन्सने कॅरी केलं आहे.
(वाचा :- स्वरा भास्करच्या मंगळसूत्रात दडलाय हा अनोखा अर्थ, या संस्कृतीशी जोडलंय खास कनेक्शन, डिझाईन बघून पडाल प्रेमातच)​

हेही वाचा :  'साहेबांची उणीव नेहमीच...' विलासरावांबद्दल बोलताना रितेश देशमुखला अश्रू अनावर

शमिताचा मेकअप

शमिताचा मेकअप

तिने अगदी नॅच्युरल मेकअप केलेला दिसला. ज्यात डेवी फाऊंडेशनसोबतच मॅट पिंक लिपस्टिकचा समावेश होता. यावेळी शमिताच्या डोळ्यांवर ब्लॅक रंगाचे गॉगल्स आणि हातात ब्राऊन रंगाची बॅग दिसून आली तर पायांत सफेद रंगाचे मोजडी स्टाईल शुज घालून तिने हा लुक कमप्लिट केला होता.
(वाचा :- गुलाबी – ऑरेंज लेहंग्यात पलक तिवारीने मारली एंट्री, सूर्याचं तेज झाकोळेल इतकं तेजस्वी सौंदर्य बघून चाहते घायाळ)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातील ‘या’ गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भोयेगाव जवळ अश्मयुगीन अवजारे सापडली आहेत.  मध्यपाषाण …

‘म्हातारं लय खडूस,’ सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका, ‘अजित पवार किल्लीला लोंबकळत…’

Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, नेत्यांकडून एकमेकांवर …