शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! आता वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा

New Education Policy: शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत दहावी आणि बारावीला वर्षाच्या शेवटी बोर्ड परीक्षा देता येत होती. दहावीनंतर दोन आणि नंतर 3 वर्षे अशा शिक्षणाच्या पॅटर्नमध्ये आता बदल होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत हा बदल होणार आहे. त्यानुसार यापुढं वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा होणार आहे. यामुळे शिक्षणाचा 10 प्लस 2 पॅटर्नही होणार रद्द होईल. 2024 पासून केंद्र सरकार नवे शैक्षणिक धोरण लागू करणार आहे.

शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा देता येणार आहे. तसेच अकरावी आणि बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता विषय निवडीचे देखील स्वातंत्र्य असणार आहे. या विद्यार्थ्यांन दोन भाषांचा अभ्यास करता येईल. यामध्ये एक भारतीय भाषा असेल. यासाठी नवा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकेदेखील तयार केली जात आहे. 

सेमिस्टर किंवा नियतकालिक पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश सर्व महाराष्ट्र, दिल्ली,सीबीएसईसह सर्वच बोर्डांना देण्यात आले आहेत. एकूण प्रमाणीकरणात कामगिरीवर आधारित मूल्यांकनावर 75 टक्के आणि लेखी परीक्षेवर 25 टक्के भर दिला जाणार आहे. तसेच विज्ञान आणि इतर विषयांचे मूल्यमापन कामगिरीवर आधारित म्हणजेच प्रयोगाशी जोडलेले असेल. विषयाच्या प्रमाणीकरणात त्याला 20 ते 25 टक्के महत्त्व असायला हवे. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हायला मदत होणार आहे. 

हेही वाचा :  'कमी शिकलोय म्हणून जास्त कमवतोय, कॉर्पोरेटमध्ये असतो तर...'; डोसा विक्रेत्याने शून्य मिनिटात केला अपमान

चांद्रयान-3 च्या यशानंतर आता सूर्य, शुक्राची पाळी; इस्रोची ‘अशी’ असेल संपूर्ण मोहीम

आतापर्यंतचा शिक्षणाचा 10+2 पॅटर्न सुरु होता. त्यामुळे विद्यार्थी दहावीनंतर दोन वर्षे अकरावी आणि बारावी करण्यात घालवत होती. पण आता हा पॅटर्न रद्द होणार असून यापुढे 5+3+3+4 असा नव्या पॅटर्ननुसार शिक्षण घेता येणार आहे.  

न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार केंद्र सरकारनं शिक्षण धोरणात हे महत्त्वाचे बदल केले आहेत. याची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2024 पासून राष्ट्रीय शिक्षा धोरण  2020 विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांची घराच्या सोडतीसंदर्भात मोठी घोषणा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …