IMD Weather Update: कधी ऊन तर कधी पाऊस; राज्याच्या ‘या’ भागात सूर्य ओकतोय आग!

IMD Weather Update: गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाळा (Summer) आणखी तीव्र झाल्याचं दिसत आहे. एप्रिल ते जून दरम्यान देशातील बहुतांश भागात उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आलीये. गेल्या महिन्याभरापासून पावसाने (Rain Update) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं होतं. अशातच गेल्या आठवड्यापासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झालाय. मात्र, राज्याच्या काही भागात ऊन पावसाचा खेळ सुरू असल्याचं दिसतंय. (IMD Weather Update temperatures risen in many districts of maharashtra including vidarbha and marathwada latest marathi news)

कल्याण डोंबिवली सकाळी कडक ऊन तर अचानक वातावरणात बदल झालं, कल्याण डोंबिवली रिमझिम पाऊसाला सुरवात झाल्याने नागरिकांनची तारांबळ उडाली होती. अचानक अल्लाहददायक सरी तर त्यानंतर लगेचच कडक पडणाऱ्या उन्हामुळे नागरिक हैराण झाल्याचं दिसून आलं होतं.

IMD चा इशारा 

वायव्य भारतातील काही भाग आणि द्वीपकल्पीय प्रदेश वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये एप्रिल ते जून या कालावधीत कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितलं आहे.

देशाच्या वायव्य, मध्य आणि द्वीपकल्पीय प्रदेशाच्या बहुतांश भागात सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पूर्व आणि ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे आता बळीराजाचं टेन्शन वाढलंय.

हेही वाचा :  Heat Wave : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?

राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा इशारा

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नाशिक, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या 4 जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास पाऊस घेऊन जाणार की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …