D Pharmacy Paper Leaked:‘डीफार्मसी’चा पेपर फुटला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम (डीफार्मसी) परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तंत्रशिक्षण मंडळाने वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रथम वर्षातील ‘फार्मास्युटिकल केमिस्ट्री’ विषयाचा हा पेपर आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीच्या पुरवणी परीक्षेतील हा पेपर आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणावर गुन्हा दाखल केलेला नाही.

राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे अभियांत्रिकी पदविका आणि औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु आहेत. तंत्रनिकेतनचे नियमित सत्र परीक्षा, तर डीफार्मसीची पुरवणी परीक्षा सुरू आहे. पाच जानेवारीपासून परीक्षा सुरू आहेत. २५ जानेवारीपर्यंत परीक्षांचे वेळापत्रक आहे. बुधवारी दोन्ही अभ्यासक्रमांचा पेपर होता. डीफार्मसीचा बुधवारी सकाळच्या सत्रात फार्मास्युटिकल केमिस्ट्री विषयाचा पेपर होता. या विषयाची प्रश्नपत्रिका उघड झाल्याची तक्रार तंत्रशिक्षण मंडळाने पोलिसांमध्ये केली आहे. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, पेपरकोड २०११२, पीएच१जे फार्मास्युटिकल केमिस्ट्री विषयाचा पेपर माध्यम प्रतिनिधींन फुटला असल्याचे सांगितले. त्यानंतर मंडळाचे उपसचिव अक्षय जोशी, विशेष कार्य अधिकारी डी. आर. दंडगव्हाळ यांनी शहरातील एका केंद्रावर भेट देत संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका तपासली, सोशल मीडियावरून आलेल्या प्रश्नांची आणि प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची पाहणी केल्यास प्रश्न क्रमांक १ व २ मधील काही प्रश्नांमध्ये साम्य असल्याचे आढळून आले.

हेही वाचा :  नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती

राज्यभरातील पालिकांमध्ये होणार भरती, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Success Story: सायकलवर भाजी विक्रेत्याचा मुलगा बनला सीए, रोहितच्या संघर्षाची कहाणी जाणून घ्या

पुढील दोन दिवसांचे पेपरही फुटल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. उशिरापर्यंत या प्रकरणी तपास सुरू होता. तर या प्रकरणी आता पेपर पुन्हा होणार की, झालेला पेपर रद्द करण्यात येईल. याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विभागात २०६ केंद्रांवर परीक्षा

परीक्षेत औरंगाबाद विभागीय मंडळात तेरा जिल्ह्यांत एकूण २०६ परीक्षाकेंद्रे आहेत. त्यापैकी औरंगाबादमध्ये सहा परीक्षा केंद्रे आहेत. विभागात औषधनिर्माणशास्त्र पदविका व अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी १ लाख २६ हजार ४३८ परीक्षार्थी आहेत. त्यापैकी बुधवारच्या फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या पेपरला विभागात ३ हजार ५०० विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येते. बुधवारी सकाळी ९:३० ते १२:३० यावेळेत हा पेपर झाला.

६० गुणांचे प्रश्न

फार्मास्युटिकल केमिस्ट्री विषयाचा पेपर ८० गुणांचा आहे. त्यात सोशल मीडियावरील प्रश्न व प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये सुमारे ६० गुणांचे प्रश्नांची साम्य आढळले असे अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात येते. सोशल मीडियावरील पेपर टाइप करण्यात आला होता. पहिला प्रश्न संपूर्ण साम्य होते तर, दुसऱ्या प्रश्नातील उपप्रश्न खाली वर करण्यात आलेले होते. प्रश्नपत्रिकांची शहानिशा करण्यात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली व तो अहवाल मंडळ कार्यालयाला पाठविण्यात आला.

हेही वाचा :  Digital क्षेत्रात SEO तज्ञांना मोठी मागणी; लाखांमध्ये मिळेल पगार, करिअर कसे कराल? जाणून घ्या

याबाबत आम्ही पोलिसठाण्यात तक्रार अर्ज सादर केला आहे. यासह वरिष्ठ कार्यालयालाही या संदर्भातील अहवाल सादर केला आहे. पेपर व पुढील सूचना आल्यानंतर त्या कळविण्यात येतील. परीक्षेबाबत मंडळाकडून खबरदारी घेण्यात येते. प्रश्नपत्रिका पाकिटबंद असतात. त्या ‘इन कॅमेरा’ उघडल्या जातात. प्रत्येक दिवशी वितरण केंद्रावरून प्रश्नपत्रिकांचे विरतण करतांना निरीक्षकही बदलले जातात.
अक्षय जोशी, विभागीय उपसचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, औरंगाबाद

नॅक मूल्यांकन प्रक्रिया न करणाऱ्या कॉलेजांचे प्रवेश बंद

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …