सारखं लघवीला होत असेल तर हलक्यात घेऊ नका, असतील हे 4 गंभीर आजार

लघवीशी निगडीत अनेक समस्या आहेत, त्यापैकी एक मूत्रमार्गातील संसर्ग (Urinary Tract Infection) आहे, ज्याला सामान्यतः UTI म्हणून ओळखले जाते. हा एक प्रकारचा संसर्ग आहे जो मूत्रमार्गात होतो. हा संसर्ग बहुतेकदा बुरशीजन्य, जीवाणू आणि विषाणू यांसारख्या जंतूंमुळे होतो. त्याचा किडनी, गर्भाशय आणि मूत्राशयावर परिणाम होतो. UTI किती गंभीर आहे? जेव्हा संसर्ग किडनीत पसरतो तेव्हा ही स्थिती खूप वेदनादायक होऊ शकते. द्वारका स्थित एचसीएमसीटी मणिपाल अस्पतालमध्ये एचओडी अँड कंसल्टेंट असलेले यूरोलॉजी डॉक्टर संजय गोगोई यांनी लघवीच्या समस्यांमागे कोणती कारणे असू शकतात आणि त्या कशा टाळाव्यात हे स्पष्ट केले आहे.

लघवीच्या आजाराची लक्षणे

  1. वारंवार लघवीला जाण्याची इच्छा
  2. लघवीतून दुर्गंधी येणे
  3. लघवी करताना जळजळ किंवा वेदना
  4. रंग नसलेली, गडद किंवा लघवीतून रक्त पडणं
  5. ताप किंवा थंडी वाजून येणे
  6. थकवा
  7. मळमळ
  8. स्नायूदुखी
  9. उलट्या होणे
  10. महिलांमध्ये ओटीपोटात वेदना
  11. पाठीच्या खालच्या भागात दाब किंवा क्रॅम्प्स येणं

(वाचा :- अरे बापरे, करोनाचा भयंकर प्रकोप, वॅक्सिन घेतलेल्यांमध्ये दिसतायत ही 5 लक्षणं, एकसाथ आल्यात करोनाच्या तीन लाटा?)

हेही वाचा :  आंघोळ करताना लघवी करण्याची घाणेरडी सवय लगेच सोडा, या ५ आजारांमुळे Urinary Bladder आकुंचन पावेल

लघवीच्या समस्यांमागील कारणं

जेव्हा मूत्रमार्गात बुरशी, बॅक्टेरिया किंवा विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा मूत्रमार्गात समस्या उद्भवतात. लघवीच्या समस्यांची काही कारणे खाली दिली आहेत.

  1. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती
  2. पुरुषांमध्ये वाढलेली प्रोस्टेट
  3. डायबिटीज
  4. काही इतर गोष्टी ज्या मूत्रमार्गात अडथळा आणतात, जसे की किडनी स्टोन किंवा मुतखडा

(वाचा :- Cancer Fighting Food: कॅन्सरच्या पेशी शरीरात वाढण्याआधीच मुळापासून नष्ट करतात या 6 गोष्टी, आजपासूनच खायला घ्या)

लघवीच्या समस्या कशा रोखाव्यात

  1. भरपूर पाणी प्या
  2. वारंवार लघवी करणे
  3. लघवी केल्यानंतर अवयव स्वच्छ करा
  4. मूत्राशयाला त्रास देणारे द्रवपदार्थ पिणं टाळा
  5. जननेंद्रियाचे क्षेत्र स्वच्छ ठेवा
  6. जननेंद्रियाच्या भागात तेल लावू नका
  7. सेक्सनंतर लगेच लघवी करणे
  8. मासिक पाळीत टॅम्पॉनऐवजी मेन्युस्ट्रिअल कप किंवा सॅनिटरी पॅड यांसारखी चांगली व आरोग्यदायी उत्पादने वापरा

(वाचा :- अंथरूणातून उठल्या उठल्या येते चक्कर? समजून जा तुम्हाला झालेत कधीच बरे न होणारे हे भयंकर आजार, व्हा सावध नाहीतर)

लघवीवरील समस्यांसाठी उपाय

बहुतेक लघवीच्या समस्यांवर अँटीबायोटिक्स देऊन उपचार केले जातात. लवकर बरं होण्यासाठी औषधाचा कोर्स पूर्ण करा. याव्यतिरिक्त, आपण भरपूर पाणी किंवा इतर द्रव पिणे महत्वाचे आहे. लघवीच्या समस्येवर उपचार करूनही तुमची लक्षणे सुधारत नाहीत असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही डॉक्टर किंवा यूरोलॉजिस्टला भेट देणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :  संगमनेरमधील जगावेगळा लव्ह ट्रायँगल! ठरलेलं लग्न मोडल्याने तरुणाने स्वत:ला संपवलं

(वाचा :- हाडांचा तुटून भुगा करते Vitamin D ची कमतरता, त्वचेच्या रंगात दिसू लागतो गंभीर बदल, ताबडतोब वाचा 9 भयंकर कारणं)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …