‘माझं अन् जितेंद्रचं पोटं दाखवलं, अरे त्याने काय…’; वैतागलेल्या अजित पवारांच्या कमेंटनं पिकला हशा

Maharashtra Assembly Winter Session 2023 Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये मागील 2 दिवसांपासून पोटावरुन टोलवाटोलवी सुरु आहे. अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर अजित पवारांचं पोट सुटल्याचा फोटो पोस्ट केला. या फोटोसंदर्भात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया नोंदवली. अजित पवारांची प्रतिक्रिया ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसून अनावर झालं. अशातच आज या पोट प्रकरणावरुन अजित पवारांनी प्रसारमाध्यमांची फिरकी घेतली.

नेमकं काय झालं आहे?

काही दिवसांपूर्वी कर्जत येथे पार पडलेल्या वैचारिक मंथन मेळाव्यात अजित पवारांनी सूचक पद्धतीने वरिष्ठ असा उल्लेख करत शरद पवारांच्या धोरणांसंदर्भात त्यांना असलेले आक्षेप भाषणामधून मांडले होते. याच भाषणामध्ये त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करण्यासाठी काही लोकांना घेऊन आंदोलन करण्याचे निर्देश देण्यात आले होते असा दावा अजित पवारांनी केला. याचवेळी बोलताना अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाला उल्लेख करत मिश्कील टिका केली होती. 

हेही वाचा :  500 CCTV, दर 1.2 सेकंदांला अपडेट अन्...; कशी असते Parliament Security System

आव्हाडांची पोस्ट

अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा एक फोटो शेअर केला. आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन आव्हाड यांनी अजित पवारांचा एका कार्यक्रमातील फोटो शेअर करत ढेरी वाढल्याचं दाखवलं. “दादा त्यादिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 पॅक अ‍ॅब्स केले असतील पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो,” असा टोला त्यांनी फोटो शेअर करत लगावला. 

नक्की वाचा >> नवाब मलिकांचा अजितदादांना पाठिंबा! अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; अजित पवार म्हणाले, “फोनवर..’

अजित पवारांचं उत्तर

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी मिश्कील उत्तर दिलं. “आता पोट वाढलंय तर मी काय करु. वाढलं तर वाढलं, पण ते नुसतं वाढलं आहे त्यात महिना कोणता गेलेला नाही एवढं लक्षात ठेवा,” असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांचं हे उत्तर ऐकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरलं नाही.

आज अजित पवारांनी प्रसारमाध्यमांची फिरकी घेतली

अजित पवार आज हिवाळी अधिवेशाआधी प्रसारमाध्यमांशी विधानसभेच्या इमारतीबाहेर बोलत होते. त्यावेळी त्यांना अजित पवार गट आणि शरद पवार गटाला विधानसभेच्या अधिवेशनासाठी एकच कार्यालय देण्यात आलं आहे. याच पार्टी कार्यालयासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांनी, “इतक्या छोट्या छोट्या प्रश्नांना महत्त्व देता आणि तेच चालवत बसता. काल तर मी बघितलं कोणीतरी माझं पोट दाखवलं, जितेंद्रचं पोट दाखवलं. अरे त्याने काय होणारं आहे? कोणाची पोटं दाखवून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहेत का?” असा प्रतिप्रश्न विचारला. अजित पवारांचा प्रतिक्रिया ऐकून त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनाही हसू आलं. “महाराष्ट्रातील समस्या महत्त्वाच्या आहे. अवकाळी पाऊस पडतोय. पिकं उद्धवस्त होत आहेत. इथरही अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आरक्षणासंदर्भातील प्रश्न निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होणं. त्यामधून मार्ग काढण्याला महत्त्व देणं आवश्यक असल्याचं मला वाटतं,” असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा :  रोमान्सच्यापुढे ही नात्यात खूप काही, सुधा मूर्तीनीं सांगितले सुखी जीवनाचे रहस्य



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकांना हसवून करा ‘इतकी’ कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो …

‘मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..’; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Political Stand: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीशी काहीच घेणे देणे नाही. …