How To Block Ads On Phone: तुम्हालाही फोनवर सतत त्रास देतात का Ads? जाणून घ्या हा त्रास कसा थांबवता येईल

How To Block Ads On Phone: एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर आपण अनेकदा स्मार्टफोनवर तिच्याबद्दल गुगलवरुन चर्च (Google Search) करतो किंवा ऑनलाइन शॉपिंग अॅप्सवर त्यासंदर्भातील माहिती शोधतो. मात्र त्यानंतर अनेकदा या प्रोडक्टबद्दलच्या जाहिराती (Mobile Ads) तुम्हाला मोबाईलवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून, सोशल नेटवर्किंगवर आणि इतर ठिकाणी दिसतात. अनेकदा या जिहाराती फारच त्रासदायक ठरतात. अगदी महत्त्वाचं काही शोधायचं असतानाही या जाहिराती स्क्रीनचा व्ह्यू ब्लॉक करतात आणि आपली चिडचीड होते. अशाप्रकारे गरज नसताना जाहिरातींचा भिडामार झालेलं कोणालाच आवडत नाही. 

एकदा सर्च केलं की जाहिरातीचा भडीमार

खास करुन अ‍ॅण्ड्रॉइड फोन युझर्सला याचा फार त्रास सहन करावा लागतो. या जाहिराती नेमक्या कशा थांबवाव्यात हे अनेकांना कळत नाही. काहीजण अगदी गुगलची सर्च हिस्ट्रीही क्लियर करतात. त्यानंतरही या जाहिराती त्रास द्यायचं थांबवत नाहीत. पण एखाद्या गोष्टीबद्दल सर्च केल्यानंतर कुठेही सर्फिंग करताना मोबाईलवर दिसणाऱ्या जाहिराती अगदी सोप्या पद्धतीने थांबवता येतात अशं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच तुम्हाला आश्चर्य तर वाटेल पण हे कसं करायचं हे ही जाणून घ्यायाला तुम्हाला नक्कीच आवडेल. याबद्दलच आम्ही इथे सांगणार आहोत.

हेही वाचा :  दुचाकी घेणं आजपासून महागलं! ! Splendor पासून Destini पर्यंत, बाईक-स्कूटरच्या किंमतीत वाढ

अशा जाहिराती का येतात?

मुळात अशाप्रकारे ऑनलाइन सर्च केल्यानंतर ज्या जाहिराती येतात त्या सर्च इंजिनवर म्हणजेच अ‍ॅण्ड्रॉइडच्या बाबतीत सांगायचं झालं तर गुगलवर सर्च केलेल्या गोष्टींच्या आधारे दाखवल्या जातात. युझर्स गुगलवर काय सर्च करतात या आधारे त्यांना ते वाचत, पाहत आणि सर्फ करत असलेल्या सोशल मीडिया आणि वेबसाईटवर जाहिराती दाखवल्या जातात. म्हणजे तुम्ही एमबीए कोर्ससंदर्भात काही गुगल केलं तर तुम्हाला याच कोर्ससंदर्भातील जाहिराती दाखवल्या जातील. किंवा तुम्ही नव्या मोबाईलसंदर्भात काही सर्च केलं तर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवरील मोबाईल्सच्या जाहिरातील सर्फ करताना अनेकदा दिसतील. या सर्व जाहिरातील सर्च इंजिन कुकीज म्हणजेच तुम्ही काय सर्फ करता हे लक्षात ठेऊन पाठवल्या जातात. म्हणूनच आपण जे शोधतो त्याच्याच जाहिराती अनेकदा दिसतात. मात्र या जाहिराती छोटी सेटिंग बदलून थांबवता येतात.

जाहिराती कशा थांबवायच्या?

> फोनच्या सेटिंग (Settings) पर्यायामध्ये जा. तेथे गुगल पर्याय निवडा.

> त्यानंतर ‘मॅनेज युआर अकाऊंट’ (Manage your google account) पर्यायावर क्लिक करा. 

> युआर अकाऊंटच्या मेन्यूमध्ये ‘डेटा अ‍ॅण्ड प्रायव्हसी’ (Data & Privacy) हा पर्याय मिळेल. 

हेही वाचा :  सरकारकडून Android युजर्सना 'क्रिटिकल वॉर्निंग' जारी; वाचून हातातला फोन खालीच ठेवाल

> डेटा अ‍ॅण्ड प्रायव्हसीच्या मेन्यूमध्ये तळाशी ‘पर्सनलाइज्ड अ‍ॅड्स’ (Personalized Ads) हा पर्याय दिसेल. डेटा अ‍ॅण्ड प्रायव्हसीच्या मेन्यूमध्ये युझर्सच्या कोण कोणत्या अ‍ॅक्टीव्हीटी ट्रॅक केल्या जातात याची यादी दिसेल.

> ‘पर्सनलाइज्ड अ‍ॅड्स’च्या खाली ‘माय अ‍ॅड सेंटर’ (My Ad Center) हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यास तुम्हाला ‘पर्सनलाइज्ड अ‍ॅड्स’ सुरु ठेवायच्या आहेत की बंद यासंदर्भातील पर्याय दिसेल. ही सेटींग तुम्हाला ऑफ (OFF) करावी लागेल.

> त्यानंतर सेटिंगवर (Settings) जाऊन गुगल पर्याय निवडावा. त्यामध्ये ‘डिलीट अ‍ॅडव्हर्टायझिंग आयडी’ (Delete Advertising ID) हा पर्यायावर टॅप करुन डिलीट करा. यानंतर तुम्हाला सातत्याने पॉपअप होणाऱ्या कोणत्याही जाहिराती दिसणार नाहीत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …