Hockey World Cup 2023 स्पर्धेत आज भारत मैदानात, जपानविरुद्ध खेळणार सामना

Hockey World Cup 2023 Live Streaming : भारतीय भूमीत सुरु हॉकी विश्वचषक (Hockey World Cup 2023) स्पर्धेत भारतीय हॉकी संघ ( hockey Team India) क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला आहे. पण आजपासून (26 जानेवारी) सुरु होणाऱ्या वर्गीकरण सामन्यात भारत मैदानात उतरणार आहे. टॉप 8 मध्ये जागा न मिळवू शकलेल्या संघात नवव्या ते सोळाव्या स्थानासाठी सामने खेळवले जाणार असून यामध्ये भारत आज मैदानात जपानविरुद्ध उतरणार आहे. 

भारताचं पारडं जड

यंदाच्या विश्वचषकाचा विचार करता भारताचं पारडं जपानपेक्षा जड आहे. जपानचा संघ पूल-बीमध्ये शेवटच्या स्थानावर राहिला. त्यांना बेल्जियम, जर्मनी आणि दक्षिण कोरियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या तुलनेत जपानचा संघ खूपच कमकुवत आहे. अशा स्थितीत आज भारतीय संघ विजयाची नोंद करू शकतो, असे मानले जात आहे. कारण भारतीय संघाने या विश्वचषकात पूल स्टेजवर स्पेन आणि वेल्सचा पराभव केला आणि इंग्लंडसोबत बरोबरी खेळली. त्याचवेळी, न्यूझीलंडविरुद्धच्या क्रॉसओव्हर सामन्यात त्याला पेनल्टी शूटआऊटमध्ये थरारक पराभवाला सामोरे जावे लागले आणि तो विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. तर आजच्या भारत विरुद्ध जपान सामन्याची माहिती जाणून घेऊ…

हेही वाचा :  आरसीबीला मिळाला नवा कर्णधार? विराटनंतर 'हा' खेळाडू संघाची कमान संभाळण्याची शक्यता

कधी होणार सामना?

भारत विरुद्ध जपान हा हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारताचा सामना गुरुवारी 26 जानेवारी रोजी होणार आहे. राउरकेला येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार सायकांळी 7 वाजता सामना खेळवला जाईल. 

कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध जपान या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.

  

कसा आहे भारतीय संघ?

अभिषेक, सुरेंदर कुमार, मनप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), ललित उपाध्याय, कृष्ण पाठक, निलम संजीप एक्सेस, पीआर श्रीजेश, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, वरुण कुमार, आकाशदीप सिंग, अमित रोहिदास (उपकर्णधार), विवेक सागर प्रसाद आणि सुखजीत सिंग.

कसं आहे उर्वरीत सामन्यांचं वेळापत्रक?

 26 जानेवारी

प्लेसमेंट सामने (9 व्या ते 16 व्या क्रमांकासाठी)

27 जानेवारी
पहिला सेमी-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी  4:30 वाजता
दुसरा सेमी-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी  7 वाजता

29 जानेवारी
ब्रॉन्ज मेडल सामना– सायंकाळी  4:30 वाजता
सुवर्णपदकासाठीचा फायनल सामना – सायंकाळी  7 वाजता

हेही वाचा :  Hockey World Cup 2023: आज भारतासमोर वेल्सचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …