इतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि …, पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!

NCP Formation History : राजकारणात कोणी कोणाचं नसतं, असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील राजकारणातील काका पुतण्याच राजकारण जनतेसाठी काही नवीन नव्हतं. या देशाने अनेक बंडखोरी करणारे नेतेही पाहिले आहेत. निवडणुकीचे वारे सुरु झाले की, बंडखोरी करणारे नेत्याचे खरे चेहरे समोर येतात. इथे सत्तेसाठी रक्ताची नातीही शत्रू होतात. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात बंडखोरेचे वारे पाहिला मिळत आहे. या बंडखोरीमुळे वर्षांनूवर्ष शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा मुलगा उद्धव ठाकरेंच्या नावाने ओखळली जायची. त्यात एकनाथ शिंदे या पक्षाचा निष्ठावंत नेत्याने बंडखोरी केली आणि या पक्षाच अस्तित्व निर्माण झालं. त्यानंतर अजून एका बंडाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. ते होतं महाराष्ट्रातील शरद पवार यांच्या सर्वेसर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं. एका बंडातून स्थापन झालेला हा पक्ष पुन्हा एकदा बंडामुळे शरद पवारांच्या हातातून निसटला. (Pawar Party and Power History repeats itself Rebellion is the beginning of NCP and see the journey of the party from Sharad Pawar to Ajit Pawar)

हेही वाचा :  आज लोकसभाची निवडणूक झाली तर महाराष्ट्रात...; Opinion Poll ची थक्क करणारी आकडेवारी

पवार, पार्टी आणि पॉवर!

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घडाळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिलं आहे. त्यामुळे 20 वर्षांपासून घाम गाळून तळागाळ्यापर्यंत पोहोचून उभी केलाला हा पक्ष एका क्षणात दुसऱ्याचा झाला. तोही कोणाचा तर पुतण्या अजित पवार यांचा. शरद पवार यांच्या या वयात परत नवा पक्ष आणि चिन्हासाठी धडपड यापेक्षा त्यांच्यासाठी हा काळ कठीण असणार आहे. इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि पक्ष हातातून गेला. हो इतिहासाची पुनरावृत्ती, कारण शरद पवार यांनी बंडखोरी केली आणि त्यातून राष्ट्रवादी या पक्षाची स्थापना झाली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उदय कसा झाला?

शरद पवार यांनी राजकारणाची सुरुवात काँग्रेस पक्षातून झाली. 1958 मध्ये काँग्रेसच्या युवा शाखेतून त्यांनी राजकारण्याचा मैदानात प्रवेश केला.  60 च्या दशकाच्या मध्यापर्यंत त्यांची महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या गतिमान नेत्यांमध्ये गणना व्हायला लागली होती . 1967 मध्ये शरद पवार यांनी पहिल्यांदा बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवली. 

काळ हळूहळू पुढे जात होतो शरद पवार हे नाव आता कानाकोपऱ्यात पोहोचत होतं. अशातच 1969 मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडली आणि शरद पवार गुरु इंदिरा गांधींसोबत उभे राहिले. 1975 मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री झाले. पुढे आणीबाणीनंतर काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तेव्हा शरद पवार इंदिराजींच्या विरोधात उभे राहिले आणि पहिला बंड केला. 1978 मध्ये ते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस (यू) आणि जनता पक्षाच्या आघाडी सरकारचे नेतृत्व मोठ्या खंबीरपणे केलं. पण हे सरकार जास्त काळ टिकलं नाही आणि 1980 मध्ये सत्तेत परतल्यानंतर इंदिरा गांधींचं सरकार बरखास्त झालं. 

हेही वाचा :  शेअर मार्केटची जास्त माहिती नाही पण चांगले रिटर्न्स हवेयत? 'अशी' करा गुंतवणूक

पुढे 1986 मध्ये शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घरवापसी केली. देशातील सर्वात प्रभावशाली नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली होती. 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. पण पक्ष खचला नाही, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजय मिळला. या विजयानंतर शरद पवार यांनी उघडपणे पंतप्रधानपदाची आपली महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली.  मात्र, काँग्रेस पक्षाने यासाठी अनुभवी पीव्ही नरसिंह राव यांना निवडलं. या निवडीनंतर शरद पवार नाराज झाले असं म्हटलं गेलं. 

‘लाइफ ऑन माय टर्म्स – फ्रॉम द ग्रासरूट्स टू द कॉरिडॉर ऑफ पॉवर’ या आत्मचरित्रात शरद पवार यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 1998 मध्ये सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. यामुळे शरद पवारांसह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते नाराज झाले होते. तर देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या चरित्रात लिहिलंय की, 1999 मध्ये, जेव्हा देश लोकसभा निवडणुकीकडे सज्ज होत होता, त्या वेळी शरद पवार यांनी सोनिया गांधींच्या परदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित केली. त्यानंतर झालं ते म्हणजे शरद पवारांचं दुसरं बंड…

हेही वाचा :  NCP President: राष्ट्रवादीला मिळणार नवा अध्यक्ष? दादांपेक्षा ताईच 'फ्रंटरनर' का?

जून 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना!

काँग्रेस सोडल्यानंतर शरद पवार यांनी 10 जून 1999 ला राष्ट्रवादी हा पक्ष उदयास आला. महत्त्वाची आणि विशेष गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी ज्या पक्षाची साथ सोडली त्याच काँग्रेस पक्षासोबत युती केली. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील असे नेते या सरकारमध्ये मंत्री बनले. 2014 पर्यंत ही आघाडी सत्तेत कायम होती. मग नरेंद्र मोदींची लाट आली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष पुसले गेले. पण आज महाराष्ट्रात याच राष्ट्रवादी पक्षाचा अस्तित्वाची लढाई अख्खा देश पाहत आहे. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..’; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अ‍ॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …