हेच का अतिथी देवो भव: ताजनगरी आगऱ्यात पर्यटकाला लाठ्या-काठ्यांनी मारहाण… Video व्हायरल

Agra Viral Video : आपल्या देशात अतिथी देवो भव: असं म्हटलं जातं. पाहुण्यांना आपण मान देतो, त्यांचं आदरतिथ्य करतो. पण या प्रथेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. आगरात ताजमहल (Agra Tajmahal) पाहण्यासाठी आलेल्या एका तरुण पर्यटकाला (Tourist) तिथल्या तरुणांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी तो दुकानामध्ये शिरला, तिथे जाऊनही तरुणांनी त्याला मारहाण सुरुच ठेवली. तो हात जोडत होता, विनवणी करत होता. पण त्या तरुणांना कोणतीही दयामाया नव्हती. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हयरल (Viral Video) झाला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या आधारे ताजगंज पोलिसांनी तपास सुरु केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी तरुणाला मारत असताना त्याला वाचवण्यासाठी एकानेही प्रयत्न केले नाहीत. 

ताजनगरीत सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. फतेहबाद रोडवरच्या ताजगंज परिसरात स्थानिक युवकांनी एका पर्यटकाला मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी तो पळत होता, पण त्याचा पाठलाग करुन त्याच्या लाठ्याकाठ्या बरसवल्या जात होत्या. जवळपास 5 ते 6 तरुण पर्टचकाला मारहाण करत होते. 

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
पर्यटकाला मारहाण  करण्यात आल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सोमवारी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. पीडित पर्यटकाने याप्रकरणी तक्रार दाखल केलेली नाही. पण व्हायरल व्हिडिओच्याआधारे ताजगंज पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांची ओळख पटवून त्यांना अटक केली जाईल असं ताजगंज पोलिसांनी म्हटलंय. 

हेही वाचा :  ठरलं! 'या' तारखेला योगी आदित्यनाथ घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, व्हीव्हीआयपींची लिस्टही तयार

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक पर्यटक धावत एका दुकानात शिरताना दिसतोय. त्याच्यामागोमाग पाच ते सहा तरुण हातात लाठ्याकाठ्या घेऊन त्या दुकानात घुसतात. त्यानंतर तरुणांनी पर्यटकला लाथ्या-बुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. पर्यटक मारहाण करणाऱ्या तरुणासमोर हात जोडत विनवणी करताना दिसत आहे

त्यानंतर आणखी काही तरुण दुकानात शिरतात, त्यातला एक आरोपी पर्यटकाला हेल्मेट फेकून मारतो. तरुणांचा आवेश पाहून दुकानदारही घाबरलेला दिसत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या तपासात हा युवक दिल्लीतला असून तो आणि एक तरुणी आगऱ्यात आला होता. रस्त्यावरुन चालत असताना त्या पर्यटकाचा एका स्थानिक तरुणाला धक्का लागला आणि यावरुन वादावादीला सुरुवात झाली. त्या तरुणाने आणखी काही तरुणांना बोलावलं आणि पर्यटकाला बेदम मारहाण केली.

मारहाण करणाऱ्या तरुणांची ओळख पटली असू लवकरच त्यांना अटक करु अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा :  कोरोनाचे निर्बंध 31 मार्चपासून हटवणार, या गोष्टी अनिवार्य



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …