Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे नावच मोबाईल स्क्रीनवर दिसणार; सरकारचा मोठा निर्णय

Spam Calls, नवी दिल्ली : Spam Calls च्या त्रासापासून लवकरच मोबाईल युजर्सची सुटका होणार आहे. Spam Calls रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या(central government) दूरसंचार विभागाने(TRAI) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे थेट नावच मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. यामुळे Spam Calls करणाऱ्यांना चाप बसणार आहे. 
सिम कार्ड विकत घेताना ज्या नावाने फॉर्म भरला तेच नाव दिसणार

नंबर मोबाईलमध्ये सेव्ह नसला तरी आता कॉल आल्यावर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसणार आहे.  सिम कार्ड विकत घेताना ग्राहकांकडून एक फॉर्म भरुन घेतला जातो. या फॉर्मवर ज्या व्यक्तीचे नाव असणार आहे त्या व्यक्तीचेच नाव मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. 

कोणत्याही App शिवाय मोबाईलवर नाव दिसणार

कोणत्याही App शिवाय मोबाईलवर नाव दिसण्याची सुविधा मोबाईल ग्राहकांना मिळणार आहे. या निर्णयामुळे थेट कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर येणार आहे. नंबर ऐवजी कॉलरचे नाव मोबाईलवर दिसणार आहे. दूरसंचार नियामक अर्थात TRAI ने स्पॅम कॉल्सच्या त्रासातून ग्राहकांची सुटका करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. लवकरच सर्व मोबाइलवर हे फिचर सक्रिय केले जाणार आहे.

हेही वाचा :  फोनच्या डिस्प्लेवर नेटवर्क सिम्बॉल 'मिसिंग' असेल तर, 'असे' करा मिनिटांत फिक्स, पाहा टिप्स

दूरसंचार नियामक TRAI लवकरच कॉलर्सची KYC आधारित यंत्रणा सक्रिय करणार आहे. याच्या अंमलबजावणीनंतर मोबाईलमध्ये एकही नंबर सेव्ह नसेल आणि त्या नवीन नंबरवरून कॉल आला, तर त्या नंबरसह कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोबाइल स्क्रीनवर दिसणार आहे. 

Truecaller वरुन मिळते अनोळखी नंबरची माहिती

सध्या Truecaller App वरून अनोळखी नंबरची माहिती मिळते. मात्र, येथे मिळणाऱ्या कॉलरची माहिती खरी असतेच असे नाही. Truecaller App वर डेटा विकल्याचा देखील आरोप आहे. 

फेक कॉल्स टाळता येणार

थेट नाव मोबाईलवर दिसल्याने  मोबाईल युजर्सना फेक कॉल्स टाळता येणार आहत.  शकतील. ही यंत्रणा सक्रिय केल्यावर, दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार दूरसंचार कंपन्यांनी केलेल्या केवायसीनुसार कॉलरचे नाव फोन स्क्रीनवर दिसेल.
 म्हणजेच स्क्रीनवर सिमचे नाव दिसेल. यामुळे बंक कॉल करणारे सहज कायदेशीर तावडीत येतील.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …