Google वरचे तुमचे फोटो होणार गायब; आताच सेव्ह करा तुमचा डेटा

Google Shut Down Album Archive News In Marathi: इंटरनेट आणि गुगल हे समीकरण सर्वश्रुत असून कोणत्याही गोष्टीचे संदर्भ शोधायचा असेल तर आपण पहिले गुगलला भेट देतो. तसेच गुगलने युजर्ससाठी ट्रान्सलेशन, क्लाउड, ऑनलाईन मीटिंगसाठी गुगलमीट सारख्या खास सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.  दररोज लाखो युजर्स Google च्या वेगवेगळ्या सुविधा वापर असतात. तुम्ही पण गुगलच्या वेगवेगळ्या सुविधांचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण गुगलने आपली एक मोठी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गुगल स्वत: ईमेलद्वारे मेल करुन आपल्या युजर्सना अलर्ट करणार आहे. 

Google द्वारे “अल्बम आर्काइव फीचर” बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 19 जुलै 2023 पासून ही सेवा Google युजर्ससाठीउपलब्ध होणार नाही. तुम्हीपण अल्बम आर्काइव फीचर वापरत असल्यास तुमच्याकडे एक महिन्याचा कालावधी आहे. तसेच Google अल्बम आर्काइव फीचरचा वापर वेगवेगळ्या प्रोडक्ट कंटेंट  पाहण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी केला जातो..   

हेही वाचा :  iPhone 16 सीरीजमध्ये लाँच होणार 5 स्मार्टफोन, किंमत आणि फिचर्स जाणून घ्या

कधी होणार बंद

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, 19 जुलै 2023 पासून  अल्बम आर्काइव फीचर ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच लवकरात लवकर आपल्या डेटाचा बॅकअप घेण्याचे आवाहन गुगलमार्फत करण्यात आले आहे. 

बॅकअप कसा घ्याल?

आधी तुम्हाला गुगल अल्बममधून डेटा डाउनलोड करावा लागेल. यासाठी कंपनीने एक लिंक शेअर केली आहे. या लिंकवर तुम्ही क्लिक करून तुमचा अल्बम संग्रहण डेटा डाउनलोड करू शकता.

या सपोर्ट पेजवर सुविधा

ज्या वापरकर्त्यांना अद्याप Google चे मेल मिळालेले नाहीत ते Google च्या सपोर्ट पेजवर जाऊनही आपला डेटा डाउनलोड करू शकतात. गुगलच्या या सपोर्ट पेजवर (https://support.google.com/picasa/answer/7008270?hl=en) ला भेट दिल्यानंतर तुम्हाला डाउनलोडिंग लिंक दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा डेटा सेव्ह करू शकाल.  

अशा प्रकारे डेटा सेव्ह करा

युजर्स त्यांच्या Google अल्बम आर्काइव फीचरची (Features) सामग्री अनेक मार्गांनी व्यवस्थापित करू शकतात. यामध्ये ब्लॉगर, Google खाती, Google Photos आणि Hangouts यांचा समावेश आहे. कॉल असच्या अल्बम आर्काइव फीचरमध्ये, तुम्ही Google Chat मधील विद्यमान संलग्नके Hangouts संक्रमण म्हणून पुनर्प्राप्त करू शकता.

हेही वाचा :  भरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral

ज्यांना ईमेल प्राप्त झाला नाही, ते त्यांच्या खात्यासह अल्बम आर्काइवर भेट देऊ शकतात आणि तेथे तुम्हाला 19 जुलै 2023 नंतर काढल्या जाणार्‍या सामग्रीबद्दल वापरकर्त्यांना सूचित करणारा बॅनर दिसेल. याव्यतिरिक्त, ड्रॉपबॉक्स Google डॉक्स, पत्रके आणि स्लाइडसह त्याचे एकत्रीकरण बदलते. कंपनीने आपल्या वापरकर्त्यांना ई-मेल किंवा एक्सचेंजद्वारे माहिती दिली आहे.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …