नवीन वर्ष येताच झोमॅटोला आले अच्छे दिन; डिलिव्हरी पार्टनर्सना मिळाली 97 लाखांची टीप

Zomato Hits Highest Orders: जगभरात लोकांनी मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत केले. 31 डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्यात सगळेच रंगून गेले होते. भारतातील लोकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी झोमॅटो आणि स्विगीसारख्या अनेक फुड डिलिव्हरी अॅप्सवरुन भरभरुन खाद्यपदार्थ मागवले होते. नवीन वर्षात सर्वात जास्त ऑर्डर मिळवणाच्या रेकॉर्ड यंदा झोमॅटोच्या नावावर नोंद करत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. इतकंच नव्हे तर नवीन वर्षात झोमॅटोच्या डिलिव्हरी पार्टनरला जवळपास 97 लाख रुपयांची टिपदेखील मिळाली होती. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल  (Deepinder Goyal)ने अलीकडेच त्यांच्या ट्वीटमध्ये याचा खुलासा केला आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयलने एक ट्विटकरत या प्रकरणात खुलासा केला होता. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, लव्ह यू इंडिया! तुम्ही आज रात्री तुमची सेवा करणाऱ्या आपल्या डिलिव्हरी पार्टनर्सने आत्तापर्यंत 97 लाखाहून अधिक टिप दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी ऑफिसच्या वॉर रुमचा फोटोही पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये सविस्तर त्यांनी म्हटलं आहे की, NYE 23 (वर्षाअखेर) त्यांनी तितकेच ऑर्डर डिलिव्हर केले आहेत जितके त्यांनी नवीन वर्ष 15,16,17,18,19,20 या वर्षांत सयंक्त रुपात केल्या होत्या. 

नवीन वर्षात झोमॅटोला सर्वाधिक ऑर्डर मिळाल्या होत्या झोमॅटोच्या सीईओने एका पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, त्यांना एका सेकंदात जवळपास 140 ऑर्डर मिळत होत्या. झोमॅटोचे संस्थापक म्हणाले की, रात्री 8 वाजता 8422 ऑर्डर प्राप्त झाल्या होत्या, याचा अर्थ प्रत्येक सेकंदाला झोमॅटोला 140 फूड ऑर्डर मिळत होत्या. या ऑर्डर्समध्ये सर्वाधिक ऑर्डर बिर्याणीच्या होत्या. यासोबतच त्याने नकाशाही शेअर केला आहे.

हेही वाचा :  5 रुपयांच्या कुरकुऱ्यांमुळं पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं, कारण...

झोमॅटोच्या सीईओने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की कोलकाता येथील एका ग्राहकाने 125 खाद्यपदार्थाची एकदाच ऑर्डर दिली होती. या खाद्यपदार्थांच्या ऑर्डरमध्ये पिझ्झा, बर्गर आणि पनीरपेक्षा बिर्याणीच्या सर्वाधिक ऑर्डर आल्या आहेत. यासोबत त्यांनी म्हटलं आहे की, ‘भारत आणि बिर्याणीचे प्रेम.’ यासोबतच लोकांचे आभार मानताना त्यांनी खुलासा केला की नवीन वर्षाच्या रात्री लोकांना ऑर्डर देणाऱ्या आमच्या डिलिव्हरी पार्टनरला टीप म्हणून ९७ लाख रुपये मिळाले आहेत. त्यांनी सांगितले की, 3.2 लाख डिलिव्हरी पार्टनर नवीन वर्षाच्या रात्री लोकांना अन्न पोहोचवण्यासाठी काम करत होते.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …