Gold Price Today : सोन्याची चमक पुन्हा वाढली! खरेदीवर मोजावे लागणार जास्त पैसे, पाहा आजचा दर

Gold-Silver Price on 15 May 2023 : ऐन लग्नसराईत सोने आणि चांदीच्या (Gold-Silver Price) किमतीत वाढ झाल्याने खरेदीदारांना मोठा धक्का बसला होता. मात्र, सततच्या वाढीनंतर गेल्या आठवड्यात सोन्याचे दर खाली आले आहेत. जरी सोन्याच्या किमतीत घट झाली असली तरीही सोने अजूनही 61,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात सोन्याचा (gold rate today) दर 500 रुपये प्रति 10 ग्रॅम (जीएसटीशिवाय) खाली आला आहे. 5 मे 2023 रोजी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम रु.62000 (जीएसटी शिवाय) वर बंद झाला होता. तर चांदीचे आजचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.

जागतिक बाजारात मौल्यवान सोन्याच्या किमती कमजोरीमुळे स्थिर असल्याचे दिसत आहे, तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे किंचित वाढ झाली आहे. दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीतील अस्थिरता आणि देशांतर्गत बाजारात वाढलेली खरेदी यामुळे सोन्याची चमक पुन्हा एकदा वाढली आहे. 

वाचा : पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठे बदल, जाणून घ्या आजचे दर

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज किंवा MCX गोल्ड जून फ्युचर्स 18 रुपयांच्या वाढीसह 60 हजार 906 प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करताना दिसत आहेत. तर जुलैमध्ये चांदीचा भाव 68 रुपयांच्या वाढीसह 73,122 रुपये प्रतिकिलो व्यवहार करत आहे. 

हेही वाचा :  Gold Price Today: सोनं खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी; 24 कॅरेट सोनं आणखी स्वस्त

सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार

आज (15 मे 2023) अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचा वायदा भाव 61,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ व्यवहार करत आहे.  आज सोन्याची किंमत 24 कॅरेटसाठी 61950 रुपये आहे. कालच्या तुलनेत किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 22 कॅरेटचा आजचा दर सुमारे 56800 रुपये प्रति तोळा आहे. तर चांदीचा भाव आज 74800 रुपये प्रति किलो आहे. कालच्या तुलनेत त्यात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान जूनमधील सोन्याचे वायदे प्रति 10 ग्रॅम रुपये 60,887 वर स्थिरावले होता. तर चांदीचा जुलै वायदा प्रति किलो 73,054 रुपये वर बंद झाला होता. परिणामी 2023 मध्ये सोन्याच्या किमतीत आतापर्यंत सुमारे 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

तुमच्या शहरातील दर असे तपासा

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी IBJA च्या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …