घरीच बनवा डार्क काजळ अलर्जीची राहणार नाही भिती, ऑर्गेनिक काजळ घालेल सौंदर्यात भर

काजळ हे असे सौंदर्यप्रसाधन आहे की, इतर कोणताही मेकअप न करता केवळ डोळ्यात काजळ घातल्यानेही लुकमध्ये वेगळाच फरक जाणवतो. अनेक महिला केवळ काजळ घालण्याला प्राधान्य देतात. पण बरेचदा बाजारातून घेतलेल्या ब्रँडचे काजळ प्रत्येकाला सूट होतेच असं नाही. यासाठी तुम्ही घरच्या घरी कमी पैशात ऑर्गेनिक काजळ तयार करू शकता.

सोप्या पद्धतीने अधिक डार्क काजळ कसे तयार करायचे हे आम्ही लेखातून सांगणार आहोत. यासाठी आम्ही डिजीटल क्रिएटर प्रियांका सिंहच्या इन्स्टाग्रामचा आधार घेतला आहे. घरच्या घरी कसे वॉटरप्रूफ काजळ तयार करायचे याचे प्रात्यक्षिक यामध्ये तिने दाखवले असून तुम्हीही याचा आधार घेऊ शकता. (फोटो सौजन्य – iStock, @priyasbeautytips_ Instagram)

घरच्या घरी असे बनवा काजळ

काजळ बनविण्यासाठी साहित्य

काजळ बनविण्यासाठी साहित्य
  • वात बनविण्यासाठी कापूस
  • दिवा
  • २ चमचे ओवा
  • ४-५ बदाम
  • अर्धी वाटी मोहरीचे तेल
  • दोन कप, १ ताट
  • कागद
  • ४-५ थेंब तूप

पहिली स्टेप

पहिली स्टेप

काजळ बनविण्यासाठी सर्वात पहिल्यांदा कापसामध्ये ओवा घालून त्याची मोठी वात बनवून घ्या. ही वात दिव्यात ठेवा आणि त्यात मोहरीचे तेल घाला

हेही वाचा :  ऋजुता दिवेकरने सांगितले ऐन तारुण्यात येणाऱ्या ॲक्ने-पिंपल्सच्या समस्येवरील​​ 3 कारणे​ आणि ​उपाय

दुसरी स्टेप

दुसरी स्टेप

तेल आणि वातीने भरलेला दिवा मधोमध ठेवा आणि त्याच्या बाजूला दोन समान उंचीचे कप ठेवा. वात पेटवा आणि मग त्यावर ताट उपडे घाला जेणेकरून त्याचे कार्बन या ताटाला लागू शकेल.

(वाचा – मोहरीचे तेल आणि कडिपत्त्याचे समीकरण केसांसाठी ठरते फायदेशीर, कसे वापरावे घ्या जाणून)

तिसरी स्टेप

तिसरी स्टेप

सुरीच्या टोकाने बदाम एक एक करून दिव्याच्या वातीवर जाळा आणि त्याचे कार्बनही ताटाला वर लागू द्या. हे स्टेप बाय स्टेप तुम्ही करा. बदाम आणि ओव्याची काजळी ताटाला लागणे आवश्यक आहे इतकाच त्यामध्ये गॅप राहू द्या

(वाचा – कोरफड आणि नारळाचे तेल रात्रभर केसांना लावले तर मिळतील अफलातून फायदे, केसांची वाढ थांबणार नाही)

चौथी स्टेप

चौथी स्टेप

यानंतर तुम्ही वरील ताट सरळ केल्यावर तुम्हाला संपूर्ण काजळी लागलेली दिसून येईल. कागदाच्या मदतीने तुम्ही ही काजळी काढून घ्या आणि एका वाटीत काढा.

(वाचा – केसांना जास्त कंडिशनर लावल्याने होऊ शकतं नुकसान? काय म्हणतात तज्ज्ञ)

पाचवी स्टेप

पाचवी स्टेप

छोट्याशी डबीत ४-५ थेंब तूप घाला आणि वर काढण्यात आलेली काजळी त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्या. तुमचे डार्क आणि वॉटरप्रुफ काजळ तयार आहे. या काजळाने कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि वापरणेही अधिक सोपे आहे.

हेही वाचा :  Diabetes Remedy : घरातील झाडांची ही पानं तोडून रोज उपाशी पोटी पाण्यात घालून प्या, कधीच वाढणार नाही Blood Sugar

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या दावा केला गेलेला नाही. तुम्हाला यापैकी कोणत्याही पदार्थाची अलर्जी असल्यास वापर करू नये.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …