‘गडद अंधार’ चित्रपटातील ‘दरिया, दरिया…’ गाणं प्रदर्शित

Gadad Andhar: मराठीत पहिल्यांदाच एक वेगळा प्रयोग करण्यात येत असल्याने ‘गडद अंधार’ (Gadad Andhar) हा आगामी मराठी चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून लाईमलाईटमध्ये आहे. या चित्रपटाची उत्सुकता टिझर रिलीज झाल्यापासून वाढली आहे. आता या चित्रपटातील नवं कोरं धमाकेदार गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘गडद अंधार’ मधील ‘दरिया, दरिया…’ (Dariya) हे गाणं नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आलं आहे. टेक्निकली खूप दर्जेदार असलेल्या या सुमधूर गीतावर अल्पावधीत लाईक्सचा वर्षाव होत आहे. एका अनोख्या विश्वाची सफर घडवणाऱ्या ‘गडद अंधार’ चित्रपटाची झलक ‘दरिया, दरिया…’ या गाण्यात पहायला मिळते.

इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी ‘गडद अंधार’ या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘दरिया, दरिया…’ हे गाणं गीतकार अभिषेक खणकर यांनी लिहिलं असून, गायक-संगीतकार रोहित श्याम राऊतनं स्वत:च गायलं आणि संगीतबद्धही केलं आहे.

निळाशार समुद्र, हिरवागार समुद्रकिनारा, नारळी-फोफळीच्या बागा, अफलातून एरिअल कॅमेरावर्क आणि पाण्याखालच्या विश्वाची झलक या गाण्यात अगदी अचूकणे सादर करण्यात आली आहे. अनुप साटम यांनी या गाण्यात केलेलं अप्रतिम गिटार वादन मनाला भिडते. चित्रपटाच्या टिझरप्रमाणे ‘गडद अंधार’मधील ‘दर्या…’ हे गाणंही प्रेक्षकांना एका अनोख्या सफरीवर घेऊन जाणारं आहे. 

हेही वाचा :  Lalit Prabhakar : ललित प्रभाकरचा 'टर्री' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

पाहा गाणं: 

news reels

सुमधूर गीत-संगीताच्या जोडीला दमदार स्टारकास्ट ही ‘गडद अंधार’ चित्रपटाची जमेची बाजू आहे. यात ‘एमटिव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स 3’चा विजेता तसंच ‘बिग बॅास’ फेम जय दुधाणे मुख्य भूमिकेत असून, त्याच्या साथीला अभिनेत्री नेहा महाजन आहे. याखेरीज शुभांगी तांबाळे, आकाश कुंभार आदी कलाकारांच्याही विविध भूमिका आहेत. प्रज्ञेश कदम यांनी लौकिक आणि चेतन मुळे यांच्या साथीनं चित्रपटाचं लेखन केलं आहे. झिटारवादन भगिरथ भट यांनी केलं असून, जुईली जोगळेकर राऊत आणि आदिनाथ पाटकर यांनी बॅकिंग व्होकल्स दिले आहेत. या चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डिंग आणि मास्टरचे काम विनायक पवार यांनी साऊंडआयडियाज स्टुडिओजमध्ये केलं आहे. आदिनाथ पातकर यांनी गाण्याची व्यवस्था केली असून, या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते प्रवीण वानखेडे आहेत. सुपर नॅचरल थ्रीलर ‘गडद अंधार’ 3 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Gadad Andhar Teaser: पाण्याखालचं विश्व दाखवणारा ‘गडद अंधार’; टीझर प्रदर्शित

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …