Funny Job Application: पोरगं जोमात, HR कोमात…नोकरीसाठी तरुणाचं पत्र वाचून खदाखदा हसाल!

Funny Job Application: कोरोनाच्या सुरू होण्याच्या आधीपासूनच देशात बेरोजगारीची (unemployment) समस्या उद्भवत आहे. त्यात कोरोनाची भर, लहान उद्योग (Industries) पूर्णपणे बंद पडला आणि देशात नोकरीच्या समस्या जाणवू लागल्या. त्यामुळे गेल्या तीन वर्षात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. नोकरीसाठी तरुण वर्ग धडपड करताना दिसतोय. मात्र, नोकरीची योग्य संधी मिळताना दिसत नाही. नोकरीच्या राऊंडमध्ये सिलेक्ट होणारे अनेकजण घासून नाही तर ठासून भरती होतात. कर्तुत्वाच्या जोरावर नोकरी मिळवण्याची संख्या फार क्विचित असते. अशातच सध्या एक फोटो सध्या तुफान व्हायरल (Viral Letter) होताना दिसतोय.

एक तरूण नोकरीसाठी धडपडत होता. त्याला हवी होती एका कंपनीमधील टेकनिकल मॅनेजरची पोस्ट. नोकरीसाठी त्याने काय काय खटाटोप केलाय, हे पाहून तुम्ही तुमच्या डोक्यावर हात मारल्याशिवाय राहणार नाही. सध्या सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होतंय. त्या पत्रात एक गरजू बेरोजगाराने थेट कंपनीच्या एचआरला पत्र लिहिलं. (Funny Job Application for Technical Manager photo goes Viral on social Media)

मला तुमच्या कंपनीमध्ये टेक्निकल मॅनेजरची नोकरी हवी आहे. यापूर्वी अनेकदा मी पोस्टसाठी अर्ज केला होता. पण कंपनीमध्ये जागा नाही असं कारण सांगून तुम्ही माझा अर्ज फेटाळला. पण मला मिळालेल्या माहितीनुसार मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीचं नुकतंच निधन झालंय. त्यामुळे त्याच्या पदावर आता मला रूजू करावं ही विनंती, अशा आशयाचं पत्र तरुणाने थेट एचआरला लिहिलं आहे.

हेही वाचा :  "अबे, गाडीखाली अडकला बघ," Live Streaming करत असतानाच कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यू; थरारक VIDEO

आणखी वाचा – शारीरिक बदल होत नसल्यानं.., ‘बाई बुब्स आणि ब्रा’नंतर अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत!

पत्र लिहिलं ते लिहिलं, यापुढे हद्दच झाली. आपल्या अर्जासोबत मॅनेजरच्या मृत्यूचा पुरावा जोडला. अर्जासह त्याने मॅनेजरचं डेथ सर्टिफिकेट जोडलं.एवढंच करून थांबतोय व्हययय… तरुण मॅनेजरच्या अंतिम यात्रेमध्येही गेला होता. त्याचेही पुरावे त्यानं जोडले. हा सर्व प्रकार पाहून एचआर कोमात गेल्याशिवाय राहणार नाही.

पाहा पत्र – 

दरम्यान, 2021 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 5.98 टक्के होता, जो 2020 च्या तुलनेत 2.02 टक्के कमी आहे. मात्र, एकंदरीत दर हा सर्वसामान्य पातळीपेक्षा जास्त असल्याचं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. नोकरीच्या शोधात बसलण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, असं सरकार नेहमी सांगत असतं.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? ‘या’ मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …