Farhan Akhtar Wedding Ceremony : बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) 19 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. फरहानच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्यातील हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि फरहान अख्तरचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
फरहान- शिबानीच्या लग्नातील हृतिक रोशन आणि फरहान अख्तरचा डान्स चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हृतिक रोशन आणि फरहान अख्तर त्यांच्या ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ या सिनेमातील ‘सेनोरिटा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दोघांचा डान्स चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
फरहान शिबानीच्या लग्नात ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी
रिया चक्रवर्ती, हृतिक रोशन, साकिब सलीम, अमृता अरोरा, चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर, रवीना टंडनचा पती अनिल थडानी, अनुषा दांडेकर, चित्रपट निर्माते राकेश ओम प्रकाश मेहरा या सेलिब्रिटींनी फरहान शिबानीच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावली आहे.
संबंधित बातम्या
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार रावकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पत्रलेखासोबतचा फोटो शेअर करत म्हणाला..
Boss Mazi Ladachi : खडूस बॉसच्या भूमिकेसाठी भाग्यश्री लिमये नव्हे ‘या’ अभिनेत्रीला मिळाली होती ऑफर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या

