Exclusive: खणाची साडी ठरतेय सेलिब्रिटींची पसंती, सणासुदीलाही ठरतेय खास

अगदी पूर्वपरंपरेपासून पैठणी साडी ही आपल्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवी असं प्रत्येक महिलेला वाटतं पण आता अशीच एक साडी आपल्याकडे हवी असंही अनेक महिलांना वाटायला लागलं आहे आणि ती साडी म्हणजे खणाची साडी. खणाची साडी गेल्या काही वर्षांपासून ट्रेंडिंग आहे. पण या साड्यांमध्ये तेच तेच डिझाईन नको असेल तर अशा वेगळ्या डिझाईन्सच्या साड्याही आपण सोशल मीडियावर पाहतो ज्या काही सेलिब्रिटींमुळे प्रसिद्ध झाल्या आहेत.या डिझाईन्स आपल्याकडेही असाव्यात असं वाटलं तर नवलं नाही. पाहूया कशा आहेत या डिझाईन्स (फोटो सौजन्य – K2Fashion संस्थापक आणि सेलिब्रिटी स्टायलिस्ट केतकी शहा मुक्कीरवार)

​गडद रंगाची निवड​

​गडद रंगाची निवड​

रसिकाची ही साडी K2Fashion च्या केतकी शहा मुक्कीरवार यांनी डिझाईन केली असून मरून रंगाची निवड केली आहे. खणाच्या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गडद रंगाची निवडच केली जाते. पण सेलिब्रिटींच्या पसंतीला या साड्या उतरत आहेत त्याचे कारण म्हणजे त्यावरील डिझाईन्स.

हेही वाचा :  मोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा

​खणाच्या साडीवरील खास डिझाईन्स​

​खणाच्या साडीवरील खास डिझाईन्स​

साडीवरील चंद्रकोर, मोर, पोपट, बैल अथवा कस्टम डिझाईन्समुळे या साड्यांना अधिक शोभा आलेली दिसून येत आहे. खणाच्या साडीवर नक्की काय करता येणार या पलीकडे जाऊन मराठमोळा टच देण्यात आला आहे. पैठणी साडीप्रमाणेच खणाच्या साडीला महत्त्व यावे हाच यामागील उद्देश असल्याचे केतकी शहा मुक्कीरवार यांनी सांगितले.

(वाचा – ४७ व्या वर्षीही कमालीचा फिटनेस, व्हाईट डीप नेक जंपसूटमध्ये शिल्पा शेट्टीचा हटके अंदाज)

​जोडप्यांसाठीही खास कस्टमाईज खण​

​जोडप्यांसाठीही खास कस्टमाईज खण​

खणाची साडी ही ज्याप्रमाणे महिलांसाठी खास ठरतेय त्याप्रमाणे सणासुदीला जोडप्यासाठीही ही फॅशन स्टाईल अधिक फॉलो केली जातेय. प्रसाद ओक आणि मंजिरी ओकचा हा लुक पाहिल्यानंतर तुम्हीही सणासुदीला या स्टाईलवरून प्रेरणा घेऊ शकता. ब्लाऊजच्या रंगाचा खणाचा कुरता तुम्ही जोडीदाराला शिऊन घेऊ शकता. मिसमॅच ब्लाऊज खणाच्या साड्यांवर अधिक सुंदर दिसतो.

(वाचा – लुक आणि फिगरच नाही तर फॅशनमध्येही देतेय मलायकाला टक्कर, हिना पांचाळचा ग्लॅमरस अंदाज)

​चंद्रकोर आणि चांदण्या​

​चंद्रकोर आणि चांदण्या​

खणाच्या साडीवर मराठमोळ्या लुकसाठी अधिक प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. अमृताने नेसलेल्या साडीवर चंद्रकोर आणि चांदण्या अशी डिझाईन करण्यात आली आहे. डिझाईन्सच्या बाबतीत विचारल्यावर केतकीने सांगितले की, एका साडीवर डिझाईन तयार होण्यास कमीत कमी ५ दिवस लागतात. तर या साड्यांचे वैशिष्ट्य आहे की, सर्व डिझाईन्स हे हँडक्राफ्टेड आहेत आणि त्यामुळेच सेलिब्रिटीजना या साडीची भुरळ पडली आहे.

हेही वाचा :  Maharashtra Crime News : उत्तर प्रदेशातील मजुराचा धुळ्यात खून, महिलेसोबतच्या संबधानंतर मित्रानेच केली हत्या

(वाचा – मराठमोळ्या तेजस्वीचे साडीतील तेजस्वी रूप, डोळ्यांचे पारणे फिटेल असा लुक)

​बंधगळा खणाचे कुरते​

​बंधगळा खणाचे कुरते​

केवळ साड्याच नाही तर पुरूषांसाठीही सणांना खास पेहराव करता यावा म्हणून बंधगळा खणाचे कुरते डिझाईन्स करण्यात येत आहेत. यामध्ये अनेक रंग उपलब्ध असून तुम्ही तुमच्या जोडीदारासह हे मॅच करू शकता. खणाची ही स्टाईल सध्या जोडप्यांसाठी पर्वणीच ठरली आहे. प्रसाद ओक – मंजिरी ओक, सुबोध भावे – मंजिरी भावे, मृण्मयी देशपांडे – स्वप्नील राव अशा अनेक सेलिब्रिटी जोड्यांना या पेहरावात तुम्ही पाहू शकता आणि फॅशन स्टाईलसाठी नक्कीच प्रेरणा घेऊ शकता.

​जगभरात होतेय खणाची स्टाईल प्रसिद्ध​

​जगभरात होतेय खणाची स्टाईल प्रसिद्ध​

गेल्या काही वर्षांपासून मराठी सेलिब्रिटीजमध्येच नाही तर अगदी जगभरात ही खणाची स्टाईल प्रसिद्ध होत आहे. वेगवेगळ्या डिझाईन्समुळे मराठमोळ्या सणाला ही स्टाईल अधिक खास दिसते आहे. विशेषतः गुढीपाडव्यासारख्या सणाला ही मराठमोळी खणाची स्टाईल अधिक वापरली जात असल्याचेही दिसून येते आहे.

​लग्नासाठीही ठरतेय खास​

​लग्नासाठीही ठरतेय खास​

लग्नासाठी पैठणीच हवी असा अट्टाहास आता होत नाहीये. कारण खणाच्या साडीतील वेगवेगळे गडद रंग. खणाच्या साडीच्या वेगवेगळ्या स्टाईल्स आणि मग त्यावरील डिझाईन्स यामुळे लग्नात अनेक नववधूही खणाच्या साडीचा पर्याय निवडताना दिसून येत आहेत. यासह ऑक्सिडाईज्ड दागिन्यांची स्टाईल केल्यावर अधिक सुंदर आणि आकर्षकता जाणवतेय.

हेही वाचा :  'एक पुतीन दिल्लीत बसलेत, ते आमच्यावर रोज मिसाईल सोडतात' पाहा संजय राऊत काय म्हणाले

तुम्हीही यावर्षी सणासुदीला वेगळ्या साडीचा विचार करत असाल तर सेलिब्रिटीप्रमाणे खणाच्या साडीचा नक्कीच विचार करू शकता.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …