Essay on Sexual Fantasy: उडाला ना गोंधळ! शिक्षकांनी मुलांना ‘सेक्शुल फॅन्टसी’वर निबंध लिहायला सांगितला अन्…

Essay on Sexual Fantasy: लैंगिक शिक्षण (Sex Education) हा सध्या जागतिक मुद्दा झालेला आहे. शाळेत, कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी अनेकदा लैंगिक छळाचे (Sexual Harrasment) प्रकार ऐकायला मिळतात. आपण सर्वत्र पाहतो की लहान मुलांमध्येही आता ‘रिलेशनशिप’ ही संकल्पना खूप वेगानं मुरायला लागली आहे. डेटिंग, बिचिंग, चिटिंग, डबल डेटिंग, फ्रेण्ड्स विथ बेनेफिट्स, सेक्शुअल रिलेशनशिप, लिव्ह इन रिलेशनशिप, थ्रीसम, ऑफिस स्पाऊन्झ अशा नाना तऱ्हेच्या गोष्टी या आता आपल्या भारतीय संस्कृतीचाही (Relationship) भाग झाली आहेत. ग्लोबलायझेशननंतर असे प्रकार हे कॉर्पोरेट कल्चरमध्ये वाढू लागले होते. आता यांचा विस्फोट झालाय असं म्हणायला हरकत नाही. (what is sexual fantasy in teenagers in america teacher asked students to write essay on sexual fantasy parents shocked)

या सगळ्या गोष्टींमुळे घटस्फोट (Divorce), नाती बिघडणं आणि अविश्वास यांचा फैलावही वेगानं होतो आहे. परंतु असे असले तरीही आजही समाजात नाती जपणारी, विश्वास दाखवणारी आणि प्रेम व्यक्त करणारी आदर्श जोडपीही पाहायला मिळतात. परंतु या सगळ्यात एक मुद्दा येतो तो म्हणजे लैंगिकतेचा (Sexuality). लहान मुलांमध्येही या भावनेचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. त्यातून ‘सेक्शुल फॅटन्सी’ (What is Sexual Fantasy) ही संकल्पनाही लहान मुलांच्या मनात विकसित होते आहे. नक्की सेक्शुल फॅन्टसी असते तरी काय? आपण ज्या प्रकारे दिवा स्वप्नात रंगतो त्याचप्रमाणे आपण लैंगिकतेचेही स्वप्न पाहतो. याचे प्रमाण आता लहान मुलांमध्येही वाढू लागले आहे. लैंगिकता हा फार संवेदनशील मुद्दा आहे. त्यातून याबद्दलचे शिक्षणही लहान मुलांना देणे आवश्यक झाले आहे. 

हेही वाचा :  Russia Ukraine War : रशियाने युक्रेनविरोधात उपसले घातक ब्रह्मास्त्र

नक्की प्रकार काय? 

अनेक देशांमधून आता लैंगिक शिक्षणाबद्दल जागरूक करण्यासाठी विविध उपक्रम सुरू आहेत. अशाच अमेरिकेतील एका शाळेत शिक्षकांनं विद्यार्थ्यांना ‘सेक्शुल फॅन्टसी’वर निबंध लिहायला सांगितला परंतु त्यातून विचित्र घटनाच बाहेर आली आहे. हा प्रकार मुलांकडून त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचला आणि त्यातून काहीतरी भलतंच समोर आलं आहे. ही बाब चक्क शिक्षक प्रशासनपर्यंतही पोहचली आहे. नक्की असं झालंय तरी काय या लेखातून जाणून घेऊया. 

डेली स्टारच्या वृत्तानुसार, ही घटना ओरेगॉन या शहरातील एक शाळेतील आहे. येथील शिक्षकानं विद्यार्थ्यांना ‘सेक्शुल फॅन्टसी’वर लिहायला सांगितले. मुलांच्या मनात त्यांच्या लैंगिकतेबद्दल काय कल्पना आहेत यावर त्यांनी लिहिलेदेखील. या शाळेचे नाव हे चर्चिल हायस्कूल असे आहे. आरोग्य विभागातील हा प्रकार आहे. या शिक्षकाचे नाव कर्क मिलर असल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा – VIRAL: ‘तुम्ही समाजसुधारक असता तर…’ इयत्ता 5 वीतल्या मुलानं लिहिलेलं उत्तर वाचून तुमचे डोळे भरून येतील

 पालकांनी पाहिलं तेव्हा… 

हा प्रकार मुलांनी त्यांच्या पालकांना सांगितला आणि त्यानंतर पालकांनी याबद्दल शिक्षकांवर आणि शाळेवर जबर टिका केली. या निबंधाचे काही स्क्रिनशॉट्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले असावेत असे कळते. त्यानंतर अनेकांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली व त्याचसोबत ही असाईनमेंट त्यांच्या अभ्यासक्रमातूनही वगळ्यात यावी याकडे टीकाकारांनी लक्ष वेधले आहे. 

हेही वाचा :  Ashadhi Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …