Ashadhi Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार

Ashadhi Ekadashi and Pandharpur Wari : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..!

आणिक मी देवा काही नेणे..!

गाये नाचे उडे आपुलीया छंदे..!

मनाच्या आनंदे आवडीने…

अभंगवाणीचा गजर करत मजलदरमजल करत टाळ मृदंगाच्या तालावर माउली..माउली..हा जयघोष करत संत ज्ञानेश्वर माऊलींची आषाढी पायीवारी (Ashadhi Wari) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे. पुण्यात दोन दिवस मुक्काम करून पालखी सासवडकडे मार्गस्थ झाली. सारे जण विठू नामाच्या भक्तिरसात चिंब होऊन नाचत दिवे (ashadi vari in dive ghat) घाटातून आज जाणार आहेत. माऊली.. माऊलीचा जयघोष करत आणि टाळ-मृदंगाच्या निनादात दंग होऊन लाखो वारकरी (Warkari)आज सासवडमध्ये विसावणार आहेत. (Dive Ghat)

तुकोबांची पालखी सोहळा 

तरदुसरीकडे हरिनामाचा गजर करत संत तुकाराम महाराज पालखीही (Sant Tukaram palkhi) पण मार्गस्थ झाली. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातून लोणीकडे मार्गस्थ झाली. निवडुंगा विठोबा मंदिर परिसरात विठू नामाचा गजराने दुमदुमला होता. तुकोबांची पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे (Baramati) बारामती, इंदापूर, अकलूजमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होते. (pandharpur ashadhi wari 2023  sant dnyaneshwar mauli palkhi from diveghat towards pandhari and Sant Tukaram palkhi)

हेही वाचा :  पैसे तयार ठेवा... 3 मोठे IPO दाखल! गुंतवणूक केल्यास व्हाल मालामाल; पाहा बॅण्ड, प्राइज

मुक्ताईच्या पालखीचं प्रस्थान 

पाऊले हळू हळू चाला, मुखाने हरिनाम बोला, पांडुरंग हरी, वासुदेव हरी असा विठुनामाचा गजर करत मुक्ताईनगरमधून संत मुक्ताईच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. मुक्ताईची पालखी वारीसाठी तब्बल सातशे किमीचं अंतर पार करते. दरवर्षी मुक्ताबाईच्या पालखीत मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होतात. बीड जिल्ह्यात मुक्ताबाईच्या पालखीचे चार मुक्काम असतात. 

दिवे, बोपदेव घाट वाहतुकीसाठी बंद

प्रशासनातर्फे दिवे घाट आणि बोपदेव घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये ही वाहतूक बंद राहणार आहे. पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट आणि बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरव्होळमार्गे वळवण्यात आली आहे. तर सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे.

माऊलींच्या पालखीत 2000 आयटी वारकरी

नयनरम्य आणि भक्तीभावात सुरु असलेल्या या वारीत अनेक गोष्टी आपल्याला आकर्षित करतात. ते पाहून आयुष्यात प्रत्येकाने हा अनुभव एकदा तरी घ्यावा, असं हे वातावरण असतं. गेल्या 16 वर्षांपासून आयटी दिंडी हेदेखील एक वैशिष्ट्य आहे. माऊलींच्या पालखी सोबत आयटी दिंडी आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड अशी खास वारी करते. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये लॅपटॉप काम करणारे 2 हजार हातात टाळ मृदंग पताका आणि मुखी हरीनामाचा जप करत ही मंडळी यंदा थेट पंढरपूरपर्यंत जाणार आहे.
 

हेही वाचा :  पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या 'या' एक्स्प्रेस रद्द, लोकल सेवाही बंद

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …