ईडी कोर्टात रकमेचा आकडा देताना चुकतेच कशी?; नवाब मलिकांवरील आरोपांवरुन राष्ट्रवादी आक्रमक


मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यानंतर पुन्हा सुनावणीनंतर विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याला ७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी सुनावणीदरम्यान ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या रिमांड अर्जातून नवीन माहिती समोर आली आहे. मलिकांनी हसीना पारकरला ५५ लाख रुपये दिल्याचा ईडीचा दावा चुकीचा होता, असे स्वतः ईडीने रिमांड अर्जात म्हटलं आहे. त्यामुळे आता ईडीच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

मंत्री नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिला ५५ लाख दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर केला होता. मात्र ईडीने कोर्टात फक्त पाच लाख म्हटल्याने देवेंद्र फडणवीस हे निराधार आरोप करत होते हे सिध्द होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.

५५ नाही तर पाच लाखांचा व्यवहार – ईडी

दाऊदची बहीण हसीना पारकरला ५५ लाख रुपये मलिक यांनी दिल्याचा दावा ईडीने यापूर्वीच्या रिमांड अर्जात केला होता. त्याद्वारे टेटर फंडिंगचा आरोप देखील ईडीने केला होता. त्यानंतर गुरुवारी ईडीने नवीन रिमांड अर्ज दाखल केला असून हसीना पारकरला ५५ लाख रुपये दिले ही टायपोग्राफीची चूक होती, ते पाच लाख रुपये आहे, असं म्हटले. ईडीतर्फे युक्तीवाद करणाऱ्या अनिल सिंह यांनी रिमांड अर्जातील माहिती वाचून दाखवली. पण, ५ लाख रुपये नाहीतर १ रुपया जरी टेरर फंडींगमध्ये वापरला असेल तर तो गुन्हा आहे. त्यामुळे आम्हाला त्यांची ईडी कोठडी वाढवून द्यावी, असा युक्तीवाद सिंह यांनी केला.

हेही वाचा :  ISRO ने रचला इतिहास; भारतातील सर्वात मोठं LVM3 रॉकेट लॉंच, पाहा VIDEO

त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. “आज ईडीने न्यायालयाला मागील रिमांड याचिकेत टायपोग्राफिकल त्रुटी असल्याने कथित ५५ लाख फक्त ५ लाख म्हणून वाचले जावेत असे म्हटले आहे त्यामुळे यामध्ये कोणती रक्कम खरी आहे आणि ईडीने अशी चूक का केली हे फडणवीस यांनी आता स्पष्ट करावे अशी मागणी,” महेश तपासे यांनी केली आहे. येत्या काही दिवसात खरे चित्र समोर येईल, असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.

The post ईडी कोर्टात रकमेचा आकडा देताना चुकतेच कशी?; नवाब मलिकांवरील आरोपांवरुन राष्ट्रवादी आक्रमक appeared first on Loksatta.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …