वयाच्या आधीच लहान मुलं का येतात वयात? डॉक्टरांनी सांगितली यामागची कारण

तुम्हाला तुमच्या मुलामध्ये अकाली वयात येण्याची लक्षणे जाणवत आहेत का? तसे असेल तर ते चिंतेचे कारण आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलामध्ये लवकर लवकर वयात येणाऱ्या लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे. अलीकडच्या काळात मुलांमध्ये अकाली लवकर वयात येण्याचे प्रमाण वाढले आहे. आज काही मुलांच्या शरीरात वेळेपूर्वी बदल होतात. ज्याला लवकर प्युबर्टी असे म्हणतात.

तारुण्य मुलींमध्ये 8-13 वर्षे आणि मुलांमध्ये 9-14 वर्षांच्या दरम्यान सुरू होते. त्यामुळे मुलींची मासिक पाळी आणि उंची या समस्या समोर येतात. यामध्ये शरीर स्वतः परिपक्व होऊ लागते आणि हाडे मजबूत झाल्यानंतर त्यांची वाढ थांबते. अशा परिस्थितीत, मुलांचे शरीर वेळेआधीच वयात तर येते, परंतु त्यांच्या शरीराचा योग्य तो विकास होत नाही.

यामुळे आगामी काळात मुलांमध्ये सामाजिक आणि भावनिक ताण वाढू शकतो. एवढेच नाही तर वयात येण्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावरही होतो. मायोक्लोनिकच्या म्हणण्यानुसार, सुरूवातीपासूनच मुलांच्या वयात येण्यावर उपचार केले तर त्याचा परिणाम उंची वाढण्यावरही होऊ शकतो. मदरहूड हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार बालरोगतज्ज्ञ आणि नवजात रोग विशेषज्ञ डॉ. अमित गुप्ता यांनी मुलांमध्ये अकाली वयात येण्याची काही कारणे सांगितली आहेत. (फोटो सौजन्य – iStock)

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेली खेळण्यातली कार शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

मुला-मुलींमध्ये लवकर वयात येण्याची लक्षणे

मुला-मुलींमध्ये लवकर वयात येण्याची लक्षणे

स्तनाचा आकार वाढणे, अंडरआर्म किंवा प्यूबिक केस, पीरियड्स आणि ओव्हुलेशन ही मुलींमध्ये लवकर वयात येण्याची सामान्य लक्षणे आहेत. मुलांमध्ये अंडकोष आणि पुरुषाचे जननेंद्रिय यांचा आकार वाढणे, पुरळ येणे, आवाजात बदल होणे आणि चेहऱ्यावरील केसांची वाढ ही मुलांमध्ये लवकर वयात येण्याची मुख्य लक्षणे आहेत. इतरही अनेक कारणे आहेत. ज्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही, पण वयात लवकर येण्यासाठी ती तितकीच कारणीभूत आहेत.

​(वाचा – EXCLUSIVE : शिव ठाकरेच्या नावाचं रहस्य उलगडलं, आई या नावाने मारते हाक)​

एंडोक्राइन डिस्‍टर्ब करणारी रसायने

एंडोक्राइन डिस्‍टर्ब करणारी रसायने

एंडोक्राइन हे शरीरात आढळणारे रसायन आहे. जे प्लास्टिकच्या बाटल्या, अन्न पॅकेजिंग, शॅम्पू आणि लोशनसारख्या वैयक्तिक काळजी उत्पादनांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये आढळते. शरीरातील हार्मोनल प्रक्रियांसह, मुला-मुलींमध्ये तारुण्य सुरू करण्यासाठी जबाबदार असतात.

वाचा – भाग्यश्रीच्या सौंदर्याप्रमाणेच मुलांची नावे ही आकर्षक, ‘इ’ अक्षरावरुन मुलांची नावे आणि अर्थ)

झोपेचा अभाव

झोपेचा अभाव

ज्या मुलांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांच्या हार्मोनल पातळीत बदल होण्याची शक्यता असते. यामुळे लवकर पाळी येऊ शकते. झोप ही शरीरातील हार्मोनल प्रणालीचे नियमन करण्यात मोठी भूमिका बजावते. अशा परिस्थितीत, जेव्हा झोपेचा त्रास होतो तेव्हा ही प्रणाली पूर्णपणे असंतुलित होते.

हेही वाचा :  आदिवासी आश्रम शाळेत चौथीच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा वडिलांचा संशय

​(वाचा – सत्यजित तांबे यांनी संस्कृती जपत ठेवली मुलांची नावे, नावांमध्ये दडलाय मोठा अर्थ)​

लहानपणीच लठ्ठपणा

लहानपणीच लठ्ठपणा

बालपणात जास्त वजन असलेली मुले अकाली प्रौढ होतात. शरीरातील अतिरिक्त चरबी इस्ट्रोजेन वाढवू शकते. यामुळे मुलींमध्ये तारुण्य लवकर सुरू होते. म्हणूनच पालकांनी लहानपणापासूनच मुलींच्या आहार आणि शारीरिक हालचालींना प्रोत्साहन दिले पाहिजे.
लवकर पाळी येणे हा चिंतेचा विषय आहे. हे मुलांसाठी तणावपूर्ण असू शकते. बाल तज्ज्ञ म्हणून, त्याच्या कारणांचा अभ्यास करत राहणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण पालकांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याविषयी जागरूक करू शकू.

(वाचा – Mahashivratri 2023: भगवान शिवशी संबंधित मुलींची ही अद्भुत नावे, राहील शंकराचा कृपाशिर्वाद)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …