ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेकडून मिळतात ‘या’ खास सुविधा; आत्ताच माहिती करुन घ्या!

Train Senior Citizens Facility: आज ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ साजरा केला जात आहे. समाजात ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक सोयी सुविधाची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिकांची अबाळ होऊ नये त्यांना त्रास होऊ नये म्हणून भारत सरकारकडूनही काही योजना राबवल्या जातात. भारतीय रेल्वेकडूनही ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक सुविधा दिल्या जातात. यातील 50 टक्के सुविधांबाबत अनेकांना माहितीच नाही. जर आजच्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ता आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वे सीनिअर सिटीझन्सना कोणत्या सुविधा आणि सवलती देतात हे जाणून घेऊया. 

रेल्वे कोणाला जेष्ठ नागरिक म्हणून मान्यता देते

रेल्वेच्या नियमांनुसार पुरुषांचे वय 60 वर्षे आणि महिलांचे वय 58 वर्ष पूर्ण असल्यास त्यांना जेष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा मिळू शकतात. या नागरिकांना ट्रेनच्या सर्व श्रेणीतील तिकिट धरात सूट दिली जाते. मेल एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी, जन शताब्दी, दुरंतो, या ट्रेनमध्येही मिळते. पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी 40 टक्के आणि महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळते. मात्र, करोना संसर्गाच्या कालावधीत ही सवलत बंद करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासन पुन्हा ही सवलत कधी सुरू करेल याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आले नाहीये.

हेही वाचा :  Success Story: घरच्यांचा विरोध डावलून UPSC ची तयारी, वंदना यांनी IAS बनूनच दाखवलं

लोअर बर्थ 

भारतील रेल्वे एक्स्प्रेस आणि मेलमध्ये दोन प्रकारच्या बोगी असतात. एक तर आरक्षित किंवा अनारक्षित. एखाद्या सिनीअर सिटीजनने तिकिट खरेदी केल्यानंतर रेल्वेकडून त्यांना पहिले प्राधान्य दिले जाते. रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ अलॉट करतात. या प्रमाणेच एखाद्या 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलेलादेखील ऑटोमॅटिक पद्धतीने लोअर बर्थ दिले जाते. दरम्यान, हे प्राधान्य उपलब्धतता असल्यासच दिले जाते. 

रेल्वेमधील ज्या ट्रेनमध्ये रिजर्व्ह कोचची व्यवस्था आहे. त्यातील काही बर्थ हे सिनीअर सिटीजन्ससाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. स्लीपर कोचबाबत बोलायचे झाल्यास, यातील प्रत्येक कोचमधील सहा लोअर बर्थ सिनिअर सिटीजनसाठी राखीव असते. तर, एसी 3 टायर, एसी 2 टायर बोगीत वृद्ध नागरिकांसाठी तीन लोअर बर्थदेखील सिनीअर सिटीजन्ससाठी राखीव असतात. हे बर्थ 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना व गरोदर महिलांसाठी राखीव ठेवतात. राजधानी, दूरंतोसारख्या फुल एसी ट्रेनमध्ये सामान्य मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनच्या तुलनेत काही बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. 

देशातील काही शहरांमध्ये लोकल ट्रेन प्रसिद्ध आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई या लोकल मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विभागाकडून चालवण्यात येत आहेत. या दोन्ही विभागीय रेल्वेच्या लोकल ट्रेनमधील काही जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवल्या आहेत. या गाड्यांमध्ये फक्त काही डबे महिलांसाठी राखीव आहेत. महिला ज्येष्ठ नागरिकांना त्याच डब्यांमध्ये बसवले जाते.

हेही वाचा :  भारतातील रहस्यमय रेल्वे स्थानक, एका मुलीमुळं तब्बल 42 वर्षांपर्यंत बंद ठेवण्यात आले स्टेशन, अखेर...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …