डिलिव्हरी बॉय रस्त्यातच खाऊ लागला ग्राहकासाठी नेत असलेलं अन्न?; Viral Video वरुन नेटकरी भिडले

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडीओ हे फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणांचे असतात. अनेकदा या व्हिडीओंमध्ये हे डिलिव्हरी बॉय जेवण्यास वेळ नसल्याने रस्त्यात कुठेतरी आसरा घेत जेवताना दिसतात. तर काहीजण भूक लागल्याने ग्राहकाने ऑर्डर केलेल्या अन्नातील काही गोष्टी खाताना दिसले आहेत. काही कंपन्या मोजक्या वेळेत ऑर्डर पोहोचवण्याचं आश्वासन देत असल्याने त्यांच्यावर नेटकरी यानिमित्ताने टीका करतात. तर काहीजण या फूड डिलिव्हरी बॉयवर कारवाईची मागणी करतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओत डिलिव्हरी बॉय रस्त्यावर बाईक थांबलेली असताना बॉक्समधून ग्राहकासाठी नेत  असलेलं अन्न काढून खात असल्याचं दिसत आहे. Proud To Be Indian या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 56 हजारांपेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. 

व्हायरल व्हिडीओत करण्यात आलेल्या दाव्यानुसार, सिग्नल लागला असल्याने डिलिव्हरी बॉय बाईकवर थांबलेला होता. यानंतर काही वेळाने तो मागे असलेल्या डिलिव्हरी बॉक्समध्ये हात टाकतो. त्यातील काही अन्न तो बाहेर काढतो. त्याच्या शेजारी चारचाकीत बसलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला. 

हेही वाचा :  Assembly Elections 2023 : लोकसभेची 'सेमीफायनल', कोण मारणार बाजी? चार राज्यांच्या निकालाची उत्सुकता शिगेला!

या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत आपलं मत मांडत आहेत. मात्र यावेळी त्यांच्यात मतांतर असून, ते आपापसात भिडताना दिसत आहेत. काहींनी या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर काहींनी त्याने कदाचित आपल्या डब्यातून अन्न काढून खाल्लं असावं असं सांगत दिशाभूल होत असावी अंस मत मांडलं आहे. 

“आपण चुकीचं मत मांडत आहोत! लक्षात ठेवा ही रोबोटिक डिलिव्हरी सिस्टम नाही आणि कदाचित ते त्याने सोबत नेलेलं स्वतःचं अन्न असू शकतं,” असं एका युजरने म्हटलं आहे. तर एका युजरने लिहिलं आहे की, “ते त्याचं अन्न असू शकतं. कारण ग्राहकांनी मागवलेलं अन्न पॅक केलेलं असतं, त्यामुळे चुकीची माहिती पसरवू नका,” असं एका युजरने लिहिलं आहे.

मग तुमचं मत काय आहे? हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटत आहे?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …