Covid Vaccination : १२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण १६ मार्चपासून सुरू होणार | COVID19 vaccination of 12 to 14 year olds to begin from March 16 msr 87


६० वर्षांवरील वृद्धांनाही खबरदारीचा डोस किंवा बूस्टर डोस दिला जाणार

देशभरात करोना महमारीची तिसरी लाट जरी ओसरली असली तरी देखील अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधित रूग्णांचे मृत्यू देखील सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर करोना विरोधातील लढाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता देशभरात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू केले जाणार आहे.

या मुलांना करोना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या बुधवारापसून म्हणजेच १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही करोनावरील लस दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या वर्षीच्या सुरूवातीला १५ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

“मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे! असं आरोग्यमंत्री मांडविया यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. तसेच, ६० वर्षांवरील वृद्धांनाही खबरदारीचा डोस किंवा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ‘मुलांच्या कुटुंबीयांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतो’, असे मांडवीय म्हणाले आहेत.

हेही वाचा :  Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली - जेपी नड्डा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …