Corona Guidelines : देशभरात कोरोनाच्या धर्तीवर नव्या मार्गदर्शक सूचना लागू; सावध व्हा!

Corona Guidelines Latest Update : कोरोना हद्दपार झाला, असं वाटणाऱ्यांना केंद्राकडूनच पुन्हा एकदा सतर्क करण्यात आलं आहे. कारण, देशातील (Corona Patients) कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्येचा आलेख एकाएकी वाढत असल्याचं पाहून केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झालं असून, या धर्तीवर नव्यानं काही मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. श्वास घेण्यास त्रास, ताप किंवा खोकला 5 दिवसांपेक्षा अधिक काळ असल्यास डॉक्टरचा सल्ला घेण्यास केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. (Corona Guidelines health ministry takes action as covid cases arises)

पुन्हा एकदा (Use Mask) मास्क वापरण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. याशिवाय एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखा, शरीराचं तापमान आणि ऑक्सिजन पातळीचं निरीक्षण करा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. केंद्राने याआधीच (Maharashtra Corona) महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकलाही पत्र लिहून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. (Covid test) शिवाय कोविड चाचणी, ट्रॅकिंग, उपचार आणि लसीकरणाच्या धोरणाचं पालन करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. 

कोरोनाच्या नव्या Guidelines खालीलप्रमाणे 

– श्वास घेण्यास त्रास, ताप किंवा खोकला 5 दिवसांपेक्षा अधिक काळ असल्यास डॉक्टरकडे जा
– व्हायरल फ्लू झाल्याची शंका असल्यास अँटीबोयोटिकचा वापर करु नका
– कोरोनासोबत इतर कोणत्याही विषाणूजन्य संसर्ग आहे का याची नोंद घ्या
सौम्य आजारावर सिस्टीमिक आणि कॉर्टिकोस्टिरॉईड्स घेऊ नका
– गंभीर लक्षणं किंवा उच्च ताप असलेल्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने रेमडेसिव्हिर घ्यावं
– मास्कचा वापर करा, सुरक्षित सामाजिक अंतर राखा, शरीराचं तापमान आणि ऑक्सिजन पातळीचे निरीक्षण करा 

हेही वाचा :  मोठी बातमी! केजरीवाल यांना जामीन मंजूर; 50 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर, प्रचार करणार

देशातील कोरोना परिस्थिती थोडक्यात…. 

गेल्या काही महिन्यांमध्ये देशात कोरोना रुग्णांचा आकडा कमी झालेला असतानाच एकाएकी संसर्ग होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची बाब निदर्शनास आली. तब्बल 129 दिवसांनंतर एका दिवसात कोरोनाचे 1000 हून अधिक रुग्ण आढळले. ज्यामुळं सध्या उपचाराधीन असणाऱ्या रुग्णांची संख्या 5915 इतकी झाली आहे. 

 

केंद्रानं रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील 24 तासांत 1071 नवे कोरोनाबाधित आढळले. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळं मृत्यू पावलेल्यांची संख्या 5,30,802 इतकी झाली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रक

Mumbai Local Megablock: प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 24 डब्यांच्या मेल एक्स्प्रेससाठी छत्रपती …

Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त होत आहे. 17 वर्षांचा …