भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम; संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर

loksabha election 2024 : महायुतीच्या जागावाटपावर अद्याप शिक्कामोतर्ब झालेले नाही. भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम आहे. मात्र भाजपा या 32 जागा लढवत असताना काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याच पाहायला मिळत आहे.महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा केंद्रीय मंत्री अमित शहा सोडवणार आहेत. भाजपने महाराष्ट्रीललोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 

भाजपच्या संभाव्य उमेदवारांची नावे

1. पुणे : मुरलीधर मोहोळ.

2. धुळे : सुभाष भांबरे यांच्या ऐवजी प्रदिप दिघावरकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता.

3. नांदेड – प्रतापराव चिखलीकर यांच्या जागी मिनल खतगावकर ( अशोक चव्हाण यांची भाची.आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतलेली ) उमेदवारी पुन्हा देण्याची शक्यता.

4. जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता.

5. चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवल जाण्याची शक्यता.

6. नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार.

7. नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.

   8.  अकोला : संजय धोत्रे

9. ईशान्य मुंबई : मनोज कोटक 

10. सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्या ऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता.

हेही वाचा :  Maharatra Politics : मनोज जरांगेंचा 'मध' पॅटर्न कुणासाठी ठरणार कडू? बेरजेचं गणित कुणाची लावणार वाट?

11. कोल्हापूर : सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे.

12. भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे

13. बीड : विद्यामन प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे.

14. माढा – रणजितसिंह निंबाळकर 

15. गडचिरोली : अशोक नेते यांच्या ऐवजी राष्ट्रवादी चे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपा चिन्हावर लढू शकतात.

16. भिवंडी : कपिल पाटील 

17. सांगली : संजयकाका पाटील यांच्या ऐवजी कॉग्रेस चे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकतो.

18. सातारा : उदयनराजे भोसले 

19. जळगाव : उन्मेष पाटील किंवा ए टे नाना पाटील.

20. दिंडोरी : भारती पवार 

21. रावेर : अमोल जावळे 

22. उस्मानाबाद : बसवराज पाटील (नुकताच बसवराज पाटील यांनी भाजपा पक्ष प्रवेश केलाय) 

23. उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता.

24. संभाजीनगर : विद्यामन मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड.

25: उत्तर मध्य मुंबई : पुनम महाजन यांच्या ऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता.

26. ठाणे : डॉ.संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. (ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा घेण्यास आग्रही आहे ) 

हेही वाचा :  'उद्धव ठाकरेंच्या पायउताराचा बदला घ्या...' अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश

27. रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे.( रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये अजूनही वाद सुरू आहे शिंदे गटाकडून किरण सामांत  लढण्यास इच्छुक आहेत ) 

28. दक्षिण मुंबई : राहूल नार्वेकर ( दक्षिण मध्यदक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश देऊन राज्यसभा दिली  ) 

29. राजेंद्र गावीत : सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत मात्र ते भाजपा पक्ष प्रवेश करून भाजपा तिकिटावर लढतील अशी शक्यता आहे.

30. अहमदनगर : सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे.सध्या नगरमध्ये वाद सुरू आहे.

31. अमरावती : नवनीत राणा यांचा भाजपा पक्ष प्रवेश होईल.मात्र नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत.या जागेवर आनंदराव अडसूळ हे देखील आग्रही आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …