Corona : कोरोनाकाळात दूध पिऊन वाढवा इम्युनिटी…दूध पिणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी

 Milk Benefits For Immunity: सध्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय,  (corona new verient) शिवाय थंडीचा मौसम आहे, वातावरणात चांगलाच गारवा आहे , हवामान खात्याने इशारा दिलाय कि पुढच्या 2 दिवसात राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे  (Maharashtra cold will intensify). त्यामुळे प्रत्येकजण आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देत आहे. 

दूध आपल्या प्रत्येकाच्या घरी असणारा पदार्थ आहे. आज आपण दुधाचे फायदे जाणून घेणार आहोत. (The health benefits of milk) दुधाचे सर्व फायदे तुम्हाला माहितच असावेत. दुधाला शरीरासाठी नेहमीच आवश्यक घटक मानले जाते. एवढेच नाही तर दूध हृदयरोगांचे आजार बरे करते, परंतु शरीरास आवश्यक पौष्टिकताही देखील प्रदान करते. परंतु नवीन संशोधनात असे समोर आले आहे की दररोज एका ग्लास दुधाचे सेवन केल्याने शरीरास गंभीर हृदयरोगांपासून संरक्षण मिळते. ( benefits of milk)

आंतरराष्ट्रीय संशोधनात असे समोर आले आहे की, दुधाचे सेवन केल्याने केवळ हृदयविकाराचा धोका कमी होत नाही तर कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते. या संशोधनात दोन दशलक्ष अमेरिकन आणि ब्रिटिश नागरिकांचा समावेश होता, ज्याचे निकाल आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

हेही वाचा :  Vegan डाएट फॉलो करत खायची फळं, ज्यूस अन् कच्चं अन्न; सोशल मीडिया स्टारचा अखेर मृत्यू

संशोधनात असे आढळले आहे की, जे दररोज एक ग्लास दुधाचे सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा धोका 14 टक्के कमी होतो. तथापि, आतापर्यंत दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक मानले जात होते. (milk reduces chances of heart attack)

दररोज दूध पिणार्‍या लोकांचे बॉडी मास इंडेक्स सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. याकडेही संशोधनात लक्ष वेधले गेले आहे. कोलेस्टेरॉलची (cholestol) पातळी कमी केल्याने संशोधनास योग्य संबंध सापडला नाही. या संशोधनात अनेक विद्यापीठांचे तज्ज्ञ सहभागी झाले होते. (intake of milk will increse your immunity in this corona situation know the tips )

दुधाचे सेवन केल्याने शरीर मजबूत होते. दूध शरीरात आवश्यक जीवनसत्त्वे आणि प्रथिने देखील प्रदान करते. हा अभ्यास लठ्ठपणाच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. ज्याची जगभर चर्चा होत आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …