पवार साहेबांना विश्रांतीचा सल्ला देणाऱ्या चंद्रकांत पाटलांचे मानसिक संतुलन बिघडले…

Maharashtra Politics : भाजपसाठी (BJP) प्रतिष्ठेची बनलेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीची (kasba peth assembly constituency) सध्या जोरदार चर्चा सुरुय. या निवडणुकीच्या प्रचारात आजारी असलेले खासदार गिरीश बापट (girish bapat) सक्रिय झाल्याने भाजप सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आली आहे. गुरुवारी केसरीवाड्यात खासदार गिरीश बापट यांनी कसब्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संदेश दिला. यानंतर विरोधकांकडून गिरीश बापट आजारी असून सुद्धा त्यांना प्रचारासाठी आणले जात आहे, अशी टीका केली आहे.

भाजपकडूनही याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. कसबा पेठ मतदारसंघात प्रचार करताना मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीवर (NCP) निशाणा साधला होता. “ज्येष्ठ नेते शरद पवार (Shard Pawar) यांची तब्येत 2006 पासून बिघडलेली आहे. त्यानंतरही त्यांच्या इच्छाशक्ती, शारिरिक बळाला मानले पाहिजे. त्यांच्या पक्षात एकच कार्यकर्ता बाकी नेते असा प्रकार आहे. शरद पवार हे एकटेच कार्यकर्ते आहेत. बाकी केवळ भाषणे करणारे आहेत,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

“कसब्यामध्येही शरद पवार यांना प्रचारासाठी बोलवणार आहेत. मग त्यांच्या ज्येष्ठ वयात त्यांना असे फिरवणे अमानवीय नाही का? खासदार बापट यांच्याबाबत अभिमान वाटला पाहिजे. कारण ते ऑक्सिजन सिलेंडर घेऊन प्रचारासाठी आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पवार यांना सल्ला देऊन विश्रांती घ्यावी असे सांगावे. आजारी असतानाही ही बापट भाजपचा उमेदवार जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा :  "...तर कानाखाली आवाज काढेन", अजित पवार भर कार्यक्रमात संतापले, म्हणाले "फाजीलपणा सुरु आहे"

अजित पवार यांचे प्रत्युत्तर

“जे चंद्रकांत पाटील बोलत आहेत, त्यांचे देखील मध्ये ऑपरेशन झालं आहे. ते जी वक्तव्ये करत आहेत त्यावरुन त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे का असं वाटत आहे. त्यांना स्वतःच्या मतदारसंघात एकही जागा निवडणूक आणता आलेली नाही. जिथं तुम्ही मोठे झाला तिथं तुम्हाला एक आमदार, एक खासदारही निवडूण आणता आलेला नाही,” असे प्रत्युत्तर अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं आहे.

प्राण्यांना सुद्धा असं करत नाही – छगन भुजबळ

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनीही गिरीश बापट यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मी त्यांना खूप दिवसानंतर त्यांना पाहिले. वर्तमान पत्रात पाहिल्यानंतर मला सुद्धा शॉक बसला. अशा परिस्थितीमध्येही त्यांना तिकडे आणलं म्हणजे भाजपने ही निवडणूक फारच मनावर घेतली आहे. मागच्या निवडणुकांमध्ये त्यांना जो फटका बसला त्यामुळे ते जास्त सावधगिरी बाळगत आहेत. मतदानासाठी आणलं ते ठिक होतं पण आता प्रचारासाठी अशा लोकांना उतरवत आहात याचे मला आश्चर्य वाटते. प्राण्यांना सुद्धा असं कोणी करायला लागलं तर असं करु नका असे आपण सांगतो. हे त्यापेक्षा भयानक दिसत आहेत. आजारी माणसांना आपण काम करायला सांगतोय,” असे छगन भुजबळ म्हणाले.

हेही वाचा :  PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातून पुणेकरांना काय मिळणार? वाचा तुमच्या फायद्याची गोष्ट!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …