चंद्राचा जुळा भाऊ भेटला! 2100 वर्षांपासून पृथ्वीसोबत आहे आणखी एक चंद्र; खगोलशास्त्रज्ञांचे मोठं संशोधन

Quasi-Moon, 2023 FW13  : चंद्र आणि सूर्य या दोन ग्रहांच्या मध्ये पृथ्वी आहे. यामुळेच पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या दिशेला असतो तिथे दिवस तर ज्या दिशेला चंद्र असते तिथे रात्र असते. पृथ्वीवर चंद्र हा अगदी स्पष्ट दिसतो. अमावस्या ते पौर्णिमेच्या दरम्यानच्या कालावधीत चंद्राच्या वेगळवेगळ्या छटा पहायला मिळतात. लहान मुलांच्या परिकथा आणि कवींच्या कल्पनाविश्वाl चंद्राला विशेष स्थान आहे. खगोलशास्त्रज्ञासाठी वैज्ञानिकृष्ट्या चंद्र अत्यंत महत्वाचा आहे.  चंद्राचा जुळा भाऊ खगोलशास्त्रज्ञानी शोधून काढला आहे. आकाशात आपल्या दिसतो त्याच्या व्यतीरीक्त अणखी एक चंद्र आहे जो  2100 वर्षांपासून पृथ्वीसोबत आहे आहे. याबाबत खगोलशास्त्रज्ञांचे मोठं संशोधन समोर आले आहे.

खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीसोबत फिरणारा एक ग्रह शोधून काढला आहे. हा ग्रह दिसायला चंद्रासारखाच आहे. यामुळे खगोलशास्त्रज्ञांनी याला दुसरा चंद्र असे म्हंटले आहे. 2023 FW13 असे या लघुग्रहाचे नाव आहे. मंगळ आणि शुक्र ग्रहाच्या मध्यभागी या लघुग्रहाचे स्थान आढळून आले आहे. 

28 मार्च रोजी पॅन-स्टार्स सर्वेक्षण दुर्बिणीच्या सर्वेक्षणातून शास्त्रज्ञांना चंद्रासारखा दिसणारा  2023 FW13 हा  लघुग्रह दिसून आला आहे. माउईच्या हवाई बेटावरील सुप्त ज्वालामुखी हालेकालावरील रात्रीच्या आकाशाची छायाचित्रे पॅन-स्टार्स दुर्बिणीच्या माध्यमातून टिपली गेली. यावेळी निरीक्षणादरम्यान हा लघुग्रह आढळून आला आहे. 

हेही वाचा :  आज आहे चंद्रग्रहण, आयुर्वेदिक डॉ, सांगितले या काळात खाणं व झोपणं ही कामं का करू नये

हवाईमधील कॅनडा-फ्रान्स-हवाई दुर्बिणी आणि ऍरिझोनामधील किट पीक नॅशनल ऑब्झर्व्हेटरी आणि माउंट लेमन स्कायसेंटरने या लघुग्रहाच्या अस्तित्वाला दुजोरा दिला आहे. सर्व गोष्टीची पडताळणी आणि शहानिशा करुन 1 एप्रिल रोजी या नव्या चंद्राबाबतची घोषणा करण्यात आली. 

खगोलशास्त्रज्ञ टोनी डन यांनी बनवलेल्या ऑर्बिट सिम्युलेटरचा वापर करून हा लघुग्रह शोधण्यात आला आहे.  सूर्याभोवती फिरण्यासाठी पऋ्ती जितका वेळ घेते तितका वेळ 2023 FW13 हा लघुग्रह स्वत:भोवती फिरण्यासाठी घेत असल्याचा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. 

अंदाजानुसार, 2023 FW13 सुमारे 65 फूट रुंद  असून तो पृथ्वीच्या दिशेने फिरतो. दरवर्षी हा लघुग्रह पृथ्वीच्या 15 दशलक्ष किलोमीटर इतके अंतर जवळ येत आहे. 2023 FW13 ही पृथ्वीच्याजवळ सापडलेला सर्वात पहिला लघुग्रह नाही. यापूर्वी 2016 मध्ये HO3 नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ आढळून आला होता. 2023 FW13 हा लघुग्रह 100 BC पासून म्हणजेच 2100 वर्षांपासून पृथ्वीसोबत आहे. तर, किमान 3700 AD पर्यंत म्हणजेच पुढील 1700 वर्षे पृथ्वीसोबत राहील. 2023 FW13 पासून पृथ्वीला कोणताही धोका नाही असे देखील संशोधकांचे म्हणणे आहे. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …