CBSE Term 1 निकाल आज जाहीर होणार असल्याचे ट्वीट व्हायरल.. बोर्डाने दिले स्पष्टीकरण

CBSE Term 1 Results: सीबीएसई बोर्ड टर्म १ परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार असल्याचे एक ट्वीट सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन हे ट्वीट आल्याचे भासविले जात आहे. यावर सीबीएसई बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. हे ट्वीट बनावट आणि दिशाभूल करणारे असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

सीबीएसईने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल आज जाहीर होणार नाही. सीबीएसई बारावी वर्ग टर्म १ परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार असल्याचे अनेक वेबसाइटवरुन सांगितले जात होते. मात्र, ही फेकन्यूज असल्याचे सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे.

देश आणि जगभरातील करोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएसईने यावेळी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा टर्म १ आणि टर्म २ या दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. दहावीची टर्म-१ परीक्षा ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. तर इयत्ता बारावीची परीक्षा १ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली.

सीबीएसई टर्म २ परीक्षा सुरू होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पण टर्म १ निकाल जाहीर करण्याच्या तारखेबद्दल अद्याप कोणतेही अपडेट देण्यात आले नाही. अशावेळी विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत वाढ होताना दिसत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. यासोबतच डिजिलॉकर, उमंग अॅप आणि एसएमएसच्या माध्यमातून देखील निकाल पाहता येणार आहे.

हेही वाचा :  भारत डायनेमिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती


डिजिलॉकर अॅपद्वारे CBSE टर्म १ चा निकाल तपासण्यासाठी…

स्टेप १) तुमच्या स्मार्टफोनवर Play Store वरून ‘DigiLocker APP’ डाउनलोड करा.
स्टेप २) होमपेजवरील साइन अप लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचे नाव (जे आधार कार्डाप्रमाणे), जन्मतारीख, श्रेणी, वैध मोबाइल नंबर, ईमेल आयडी, आधार क्रमांक आणि ६ अंकी सुरक्षा पिन भरा.
स्टेप ४) सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर यूजरनेम सेट करा.
स्टेप ५) खाते तयार केल्यानंतर, ‘सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी किंवा बारावी निकाल २०२१’ या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ६) तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा.
स्टेप ७) तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

CBSE दहावी, बारावीचा निकाल उमंग अॅपवर तपासण्यासाठी..

स्टेप १) मोबाइलमध्ये उमंग अॅप डाउनलोड करा.
स्टेप २) अॅपच्या होमपेजवर ऑल सर्व्हिसेस टॅबवर क्लिक करा.
स्टेप ३) त्यानंतर दहावी किंवा बारावीचे निकाल पाहण्यासाठी ‘CBSE’ या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ४) आवश्यक क्रेडेन्शियल्स भरुन लॉग इन करा.
स्टेप ५) सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी किंवा इयत्ता बारावीच्या निकाल लिंकवर क्लिक करा.
स्टेप ६) तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा.
स्टेप ७) तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

हेही वाचा :  CBSE टर्म १ चा निकाल या आठवड्यात? अधिकाऱ्याने दिली महत्वाची माहिती

महापारेषणमध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी
मार्चमध्ये निकाल जाहीर
सीबीएसई बोर्डाकडून आतापर्यंत निकालाचे अपडेट न मिळाल्यास मार्चमध्ये निकाल जाहीर होऊ शकतो, असे मानले जात आहे. सीबीएसईची प्रॅक्टीकल परीक्षा देखील २ मार्च २०२२ पासून सुरू होणार आहे. त्यामुळे बोर्डाकडून सीबीएसई टर्म १ आणि टर्म २ चा निकाल (CBSE Result)एकाच वेळी जाहीर केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर अपडेट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

HPCL Recruitment 2022: सरकारी नोकरीची संधी; हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये भरती
२६ एप्रिलपासून परीक्षा
२०२१-२२ या वर्षासाठी सीबीएसईच्या दुसऱ्या टप्प्याची बोर्ड परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होण्याची तारीख बोर्डाने अधिकृतपणे जाहीर केली आहे. दरम्यान सीबीएसईने याचे वेळापत्रक जाहीर केले नाही. हे वेळापत्रक मार्च २०२२ च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

ICT मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, २५ हजारपर्यंत मिळेल पगार
देशभरातील विद्यार्थी आणि पालक टर्म २ च्या परीक्षा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घेण्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात विद्यार्थी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शिक्षणमंत्री, सीबीएसई आणि इतरांना विनंती करत आहेत. शिकवणी वर्ग ऑनलाइन घेण्यात आले होते आणि करोना प्रादुर्भाव संपला नसताना परीक्षा ऑफलाइन का? असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत. त्यामुळे सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा :  MITL Job: महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये नोकरीची संधी, 'या' पत्त्यावर द्या मुलाखत

Government Job साठी ‘या’ वेबसाइट्सवर अर्ज केलात तर बसेल भुर्दंड
मुंबई पालिकेच्या विद्युतपुरवठा आणि परिवहन विभागात भरती, दीड लाखापर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …