बिपाशा बासूच्या ग्लॅमरचा जलवा कायम, मालदीवच्या बीचवरील सिझलिंग फोटोज इंटरनेटवर व्हायरल

अभिनेत्री बिपाशा बसूने 7 जानेवारीला तिचा 44 वा वाढदिवस साजरा केला. आई झाल्यानंतर तिचा हा पहिला वाढदिवस होता, जो मुलगी देवीसोबत तिने उत्साहात साजरा केला बिपाशा नेहमीच आपल्या मुलीसोबतचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. पण असे असतानाही सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेते तिची स्वतःची युनिक स्टाईल आणि तिचा जबरदस्त फॅशन सेन्स! एक मॉडेल म्हणून आपल्या करियरची सुरुवात करणारी बिपाशा पुढे जाऊन अभिनेत्री सुद्धा बनली. आज ती अभिनेत्री म्हणून तितकी प्रसिद्ध नसली तरी आपल्या फिटनेससाठी सुद्धा ती नेहमीच चर्चेत असते.

स्वत:चे एक फिटनेस बुक लिहावे असाही तिचा मनसुबा आहे. तिचा फिटनेस तिच्या ब्युटी आणि स्टाइलला अधिक एनहास करतो आणि ही गोष्ट तुम्ही देखील नक्कीच मान्य कराल! आज आम्ही तुमच्यासाठी बिपाशाच्या व्हेकेशनचे थ्रोबॅक फोटो घेऊन आलो आहोत, ज्यातून तुम्हीही फॅशन टिप्स घेऊ शकता. जर तुम्ही बीच हॉलिडे प्लॅन करत असाल तर बिपाशाचे हे ग्लॅमरस लूक तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. (फोटोज साभार – इंस्टाग्राम @bipashabasu)

बीच वाईब्स देणारे बिपाशाचे फोटोज

बिपाशाचे हे फोटोज तिच्या मालदीव ट्रीप मधले आहेत. जिथे ती फुल फॅशनेब्ल डिव्हाच्या रुपात दिसली. या फोटोमध्ये, तिने फ्लोरल प्रिंट आणि एका बाजूला डीप नेकलाइनसह सुंदर सी फ्रॉक स्टाइल असलेला मिनी ड्रेस परिधान केलेला दिसला. दुसरीकडे, ती क्रूझवर कफ्तान मॅक्सी सेट मध्ये मस्त एन्जोय करताना दिसत आहे. ज्यामध्ये तिने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा ब्रॅलेट परिधान केला होता आणि मल्टीकलर चंकी नेकपीससह हा लुक कम्प्लीट केला होता. गोल्ड टिंटेड शेड्स तर खूप स्टायलिश दिसत होते.

हेही वाचा :  ताई-दादा साथ साथ! पंकजा-धनंजय मुंडेंमधला दुरावा मिटला? विकासासाठी एकत्र

(वाचा :- दिवसेंदिवस मलायका होत आहे अधिकच तरूण, शॉर्ट पॅंटमध्ये सोफ्यावर बसून दिल्या अशा कातील पोझ की..!)

नियॉन ग्रीन कलरचे ऑब्सेशन

या फोटोत, बिपाशा पुलच्या किनाऱ्याला निऑन हिरव्या रंगाच्या पोंचूमध्ये दिसत आहे, ज्यासोबत तिने डेनिम शॉर्ट्स मॅचिंग केले आहेत. या ऑफ-शोल्डर स्टायलिश टॉपमध्ये बिपाशा सूर्यप्रकाशात बीच व्हेकेशन एन्जॉय करताना दिसली. दुसरीकडे, तिने हिरव्या रंगाचा कफ्तान परिधान केलेला दिसला ज्यामध्ये निळ्या स्लीव्हसह व्ही-नेकलाइन आहे. या इझी ब्रिज आउटफिटसह तिने सनग्लासेस, ब्रेसलेट आणि फ्लोरल नेकपीस घातला होता.

(वाचा :- आर्यन खानला डेट करत असल्याच्या गाजावाजामध्ये नोरा फतेहीचं रापचिक फोटोशूट व्हायरल, धोती स्कर्ट घेतोय लक्ष वेधून)

फ्लोरल प्रिंट आणि लो वेट कपडे करा कॅरी

ज्या स्त्रियांना बीच व्हेकेशनवर जायला आवडते त्यांनी लो वेट म्हणजेच हलके घालावेत, जे खूप कम्फटेर्बल एक्स्पीरियन्स देतात. या फोटोमध्ये, एका बाजूला, बिपाशा जांभळ्या आणि निळ्या रंगाच्या फ्लोरल मिनी ड्रेसमध्ये दिसत आहे, जो खूप सैल होता आणि त्याच्या स्ट्रीप्स तिच्या लूकमध्ये ऊम्फ फॅक्टर वाढवत होत्या. तर दुसरीकडे बिपाशाने पेस्टल हिरव्या रंगाचा कफ्तान परिधान केलेला दिसला. ज्यावर तपकिरी रंगाचे फ्लोरल प्रिंट होते आणि तिने एका हातात बांगड्या घातल्या होत्या.

हेही वाचा :  ब्लू रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा सिझलिंग लूक, जलपरी म्हणत शेअर केला फोटो

(वाचा :- करीना कपूरच्या भावासोबत ब्रेकअप केल्यानंतर तारा सुतारियाचं छोट्या ऑफ शोल्डर बॉडीकॉन कपड्यांत धमाकेदार फोटोशूट)

काफ्तान आहे पहिली आवड

आयडियल ट्रॅव्हल गोल्स देणाऱ्या बिपाशाने फोटोमध्ये निळ्या रंगाचा लांब कफ्तान परिधान केलेला दिसत आहे. ज्यावर लाल रंगाचे प्रिंट्स दिसत होते. ती स्टायलिश शेड्स आणि हूप इअररिंग्जमध्ये बीचवर लाउंज करताना दिसली. अजून एकदा ह्याच व्हेकेशांवर ती मल्टीकलर कफ्तानमध्ये दिसली. बीच लूकची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कमीत कमी मेहनत घेऊन तुमचा लुक स्टायलिश बनवू शकता. त्यामुळे जर तुम्ही तुमचे बीच व्हेकेशन प्लान करत असाल तर आवर्जून कफ्तान ट्राय करून पहा.

(वाचा :- ओठांवर लालभडक लिपस्टिक व लेदर पॅंटमध्ये नाजुकशी फिगर फ्लॉंट करताना दिसली मलायका, ऐन थंडीत वाढवला मुंबईचा पारा)

बीच व्हेकेशन्साठी खास टीप

बिपाशा अगदी बिनधास्तपणे बीच वर मस्ती करते आणि खूप तास उन्हात फिरत असते, पण तरी तिला टॅनिंग आणि सनबर्नची भीती वाटत नाही. कारण ती योग्य एसपीएफच्या सनस्क्रीनचा उपयोग करते. जर तुम्ही खूप तास म्हणजे खूप काळ उन्हात फिरणार असाल तर एसपीएफ 30 किंवा एसपीएफ 50 युक्त सनस्क्रीनचा वापर अजिबात करू नका. यापेक्षा कमी एसपीएफ सनस्क्रीन तुम्हाला उन्हापासून जास्त संरक्षण देऊ शकणार नाही. त्यामुळे आपले सनस्क्रीन निवडताना अगदी काळजीपूर्वक निवडा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

हेही वाचा :  'काही झालं तरी भाजपाला मत देणार नाही'; अख्ख्या गावानेच घेतली शपथ

(वाचा :- सूटा-बुटात राहणारे अब्जाधिश मुकेश अंबानींचे आजकाल बदलले आहेत अदाअंदाज, नातवाच्या बर्थ डे मध्ये चर्चा आजोबांचीच)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …