HDFC बँकेला मोठा धक्का, एका झटक्यात 100000 कोटी रुपयांचं नुकसान.. जाणून घ्या कारण

HDFC Bank Share Fall : शेअर बाजारात गुंतवणूक (Stock Market) करणाऱ्यांसाठी बुधवारचा दिवस अत्यंत वाईट ठरला.  सेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीतही 450 हून अधिक अंकांची घसरण झाली. शेअर बाजारातील या भूकंपामुळे गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालं. देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला या घसरणीचा सर्वात मोठा तोटा सहन करावा लागला.  बँकेने तीन महिन्यांत कमावलेल्या एकूण रकमेच्या पाचपट पेक्षा जास्त रक्कम एका झटक्यात नष्ट झाली. 

1600 अंकाहून अधिकची घसरण
शेअर बाजार बुधवारी सकाळी 71,988 अंकांवर खुला झाला पण बाजार बंद होताना यात 1628.02 अंकांची घसरण झाली आणि शेअर बाजार 71,500.76 अंकांवर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात निफ्टीमध्ये 460.35 अंकांची घसरण होऊन 21,571.95 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. 

बँकेचे शेअर्स 1528 रुपयांच्या खालच्या पातळीवर
शेअर बाजारातील दिवसभरातील घसरणीचा सर्वाधिक फटका HDFC बँकेच्या गुंतवणूकदारांना बसला.  कंपनीचे समभाग 8 टक्क्यांहून अधिक घसरले. ट्रेडिंगच्या शेवटच्या तासात एचडीएफसी बँक स्टॉकमध्ये (HDFC Bank Stock) मोठी घसरण नोंदवली गेली आणि बीएसईवर 8.57 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह तो 1535 रुपयांच्या निचांकी पातळीवर आला. एचडीएफसीचे शेअर्स दिवसभर रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. बँकेचे शेअर्स सकाळी 9.15 वाजता 1570 रुपयांच्या पातळीवर उघडले आणि 1528 रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेले. बँकेच्या समभागांच्या घसरणीमुळे बँकेच्या गुंतवणूकदारांना (HDFC Bank Investors) 100,000 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागलं आहे.

हेही वाचा :  काजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, "धर्माचा गांजा.."

तिन महिन्यातील कमाई गमावली
एचडीएफसी बँकेच्या शेअरमधील ही घसरण आश्चर्यकारक मानली जातेय. कारण टेड्रिंगच्या शेवटच्या दिवशी, कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले होते, जे अतिशय उत्कृष्ट होते.  एचडीएफसी बँकेच्या तिसर्‍या तिमाहीच्या निकालात निव्वळ नफ्यात 34 टक्के वाढ दाखवण्यात आली होती. यानुसार एचडीएफसी बँकेला तीन महिन्यांत 16,372 कोटी रुपयांचा नफा झाला. पण एका दिवसात कंपनीचे बाजार भांडवल (HDFC Bank MCap) 100,000 कोटींनी कमी झाले.

मंगळवारी बाजार बंद असताना HDFC बँकेचे बाजार भांडवल रु. 12,74,740.22 कोटी इतके नोंदवले गेलं होतं, पण बुधवारी ते 11.68 लाख कोटींवर आलं. त्यानुसार पाहिल्यास कंपनीचे मूल्य एका दिवसात 106740.22 कोटी रुपयांनी कमी घटलं.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …