कोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी! काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सहा जण दोषी

Coal Scam Case : कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा (Devendra Darda), कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्ता आणि यवतमाळचे उद्योगपती मनोज जयस्वाल यांना दोषी ठरवलंय. या सर्वांना 18 जुलैला शिक्षा सुनावली जाणार आहे. छत्तीसगडमधील कोळसा खाणींच्या वितरणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका कोर्टानं सर्व आरोपींवर ठेवलाय. त्यामुळे आता या सर्व आरोपींना काय शिक्षा मिळणार याकडे लक्ष लागलंय. न्यायालयाने IPC कलम  120B, 420 आणि भ्रष्टाचाराशी संबंधित कलमं या सर्व दोषींवर लावली आहेत. 

न्यायालयाने यांनाही ठरवलं दोषी
विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांच्याबरोबरच कोळसा मंत्रालयाचा माजी सचिव एस सी गुप्ता, दोन वरिष्ठ अधिकारी केएस क्रोफा, केसी सामारिया आणि मेसर्स जेएलडी यवतमाल एनर्जी प्राइवेट लिमिटेडचे मोजन कुमार जयस्वाल यांनाही दोषी ठरवलं आहे. 

काही आरोपी तुरुंगात
छत्तीसगडमधल्या कोळसा घोटळा प्रकरणात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या घोटाळ्यात राजकाणाशी संबंधीत असलेल्यांपासून नोकरदारवर्गापर्यंत अनेक जण रायपूर तुरुंगात बंद आहेत. यात आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, मुख्यमंत्र्यांचे उप सचिव सौम्या चौरसिया, कोळसा घोटाळ्यात सिंडीकेटची भूमिका बजावणारा सूर्यकांत तिवारी, सुनीर अग्रवाल यांचा समावेश आहे. 

हेही वाचा :  'यांनी तर महादेवालाही सोडले नाही'; बेटिंग अ‍ॅपवरुन पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

घोटाळ्यात अनेक जणांचे हात
या प्रकरणी काही जणांचा इडीकडून तपास केला जात आहे. यात माजी कलेक्टर आयएएस रानू साहू यांचा समावेश आहे. आगामी काळात याप्रकरणात काही बड्या लोकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय.या प्रकरणात ईडीने आतापर्यंत रानू साहू, सूर्यकांत तिवारी, आमदार देवेंद्र यादव, आमदार चंद्रदेव प्रसाद राय, आरपी सिंह, विनोद तिवारी आणि राम गोपाल अग्रवाल यांची संपत्ती, अलीशान गाड्या, दागिने आणि 51.40 कोटी रोख रक्कम जप्त केली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

याला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजारच्यांचा दारात जाऊन आईने वाजवला ढोल… Video व्हायरल

Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण …

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …